संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत अजूनही कमी झालेली नाही.अशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन हटवण्यात आले आहे. हळूहळू परिस्थीती पुर्वपदावर येत आहे. ठप्प पडलेला उद्योग व्यवसाय सुरु होत आहे. मनोरंजन क्षेत्रही हळूहळू सुरु होत आहे. शूटिंगही योग्य खबरादारीनुसार सुरु आहेत. घरात बंदिस्त असलेले कलाकार मंडळींनीही कामाला सुरुवात केली आहे. कलाकार बाहेर पडत असले तरी सुरक्षेची योग्य खबरदारी सगळेच घेताना दिसत आहेत. कोरोना काळात कलाकार मंडळी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी कामानिमित्त ये-जा करत आहेत.
अशात सारा अली खान विमानतळावर येताच मीडियाच्या कॅमे-यांनी तिला घेरले होते.साराने पांढरा सलवार सूट परिधान केला होता. यावेळी चेह-यावर मास्कही लावला होता. साराचे निट फोटो काढता यावेत म्हणून फोटोग्राफर तिला मास्क काढण्यासाठी सांगत होते. मात्र साराने असे केले नाही. सुरक्षेसाठी प्रत्येकाने मास्क लावणे गरजेच आहे.
प्रत्येकाला सारा हसतमुखाने मास्क काढणार नसल्याचे सांगत होती. तरीही कोणीही तिचे ऐकत नव्हते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट पाहायला मिळतंय.इशारे करत सारा नकार देत होती. काही वेळानंतर ती इरिटेटही झाली. हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनीही साराला कधी पाहिले नाही का? की तिला मास्क काढण्यास सांगितले जात आहे. साराने मास्क न काढण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे सांगत तिचे कौतुकही केले जात आहे.
काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारलाही फोटोग्राफर विना मास्कच फोटोसाठी विनंती करत होती. उलट यावेळी अक्षयनेही साराप्रमाणेच नकार दिला आणि उपस्थित सगळ्याच फोटोग्राफरने मास्क लावला होता पण मास्क नाकाखाली होता. त्यामुळे प्रत्येकाला नाक झाकले जाईल अशा रितीनेच मास्क लावण्याची विनंतीही त्याने केली होती.
अरबाज खान, सोहेल खान अन् त्याचा मुलगा निर्वान यांच्याविरूद्ध पालिकेने नोंदवला गुन्हा
सोहेल खान, त्याचा मुलगा निर्वाण खान आणि भाऊ अरबाज खान हे सर्व २५ डिसेंबर रोजी युएईहून मुंबईला आले होते. हॉटेल ताज लँड्स एन्ड बुक असल्याचे सांगितले गेल्यानंतर हे तिघेही विमानतळाबाहेर आले. पण हॉटेलमध्ये विलग राहण्याऐवजी (क्वारंटाईन) ते थेट घरी गेले.याबाबत माहिती पालिकेच्या एच पश्चिम विभागाला कळताच त्यांनी खान बंधू यांच्याविरोधात साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंड संहिता १८६० अनुसार गुन्हा नोंदवला होता.