Join us

साराच्या हॉट आणि बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर धूम, फॅन्सनी केल्या अशा कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 13:26 IST

सारा अली खान सध्या सिनेमांपेक्षा पसर्नल लाईफला चर्चेत आहे. कार्तिक आर्यनसोबत असलेल्या अफेअरला घेऊन सारा चर्चेचा विषय बनली आहे.

ठळक मुद्देसाराचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायेतया फोटोंमध्ये सारा खूपच स्टायलिश अंदाजात दिसतेय

सारा अली खान सध्या सिनेमांपेक्षा पसर्नल लाईफला चर्चेत आहे. कार्तिक आर्यनसोबत असलेल्या अफेअरला घेऊन सारा चर्चेचा विषय बनली आहे. सध्या साराचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायेत. साराने Harper's bazaar india मॅगझीनसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये सारा खूपच स्टायलिश अंदाजात दिसतेय. 

 यातले काही फोटो साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. साराच्या या फोटोना सोशल मीडियावर चांगलाच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. साराचा हा बोल्ड अंदाज तिच्या फॅन्सना चांगलाच भावला आहे. 

सारा अली खाननेकेदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. साराच्या पहिल्याच सिनेमातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या पहिल्या-वहिल्या चित्रपटासाठी साराने ‘फिल्मफेअर’ पुरस्कार जिंकला.

केदारनाथ’साठी बेस्ट अ‍ॅक्ट्रेस डेब्यूच्या अर्थात सर्वोत्कृष्ट पर्दापणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्काराने तिला गौरविण्यात आले. त्यानंतर ती सिम्बामध्ये रणवीर सिंगच्या अपोझिट झळकली होती. सध्या ती लव्ह आज कल या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम करत असून या चित्रपटात तिची जोडी कार्तिक आर्यन सोबत जमली आहे.

विशेष म्हणजे लव्ह आज कल या चित्रपटाचा नायक सैफ अली खान होता. सारा काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात झळकली होती. त्यावेळी कार्तिक आर्यनला डेट करायला आवडेल असे तिने सांगितले होते. 

टॅग्स :सारा अली खानकेदारनाथ