Join us  

ब्रेकअपनंतर सारा अली खान करणार एक्स बॉयफ्रेंडसोबत काम; नवीन वर्षापासून सुरू होणार शूटिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 4:09 PM

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन एकाच चित्रपटात काम करणार असल्याचे अपडेट समोर आले आहे. 

बॉलिवूडचा शहजादा कार्तिक आर्यन आणि सारा अली खानच्या अफेअरची चर्चा होती. मात्र हे नातं फार काळ चाललं नाही. तरी दोघंही मित्र बनून राहिले. आता यातच एक सारा अली खान आणि कार्तिक आर्यन एकाच चित्रपटात काम करणार असल्याचे अपडेट समोर आले आहे. 

'भूल भुलैया 3' मध्ये कार्तिक आर्यनसोबत सारा अली खान झळकणार असल्याचे बोलले जात आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया' आणि 'भूल भुलैया 2' बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. पहिल्या चित्रपटात अक्षय कुमारने तर दुसऱ्या चित्रपटात कार्तिक आर्यनने मुख्य भूमिका साकारली होती. या फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागामध्ये आता साराची एन्ट्री होणार आहे. मात्र, अद्याप अधिकृत घोषणेची चाहते प्रतीक्षा करत आहे.

कार्तिक आणि सारा स्टारर चित्रपट 'भूल भुलैया 3' ची शूटिंग फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल. कार्तिक आणि सारा इम्तियाज अलीच्या 'लव्ह आज कल' (2020) चित्रपटात एकत्र दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी दाखवू शकला नव्हता. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरची चर्चा होती. परंतु अचानक सारा आणि कार्तिकनं ब्रेकअप करत चाहत्यांना धक्का दिला होता. 

नुकतंच कॉफी विथ करणच्या शोमध्ये साराने कार्तिकसोबतच्या नात्यावर भाष्य केलं होतं. यानंतर कार्तिक मात्र नाराज झाला होता. नात्याचा, त्या व्यक्तीचा आदर करणं गरजेचं आहे असं तो म्हणाला होता. आता पुन्हा सारा आणि कार्तिकला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

टॅग्स :सारा अली खानकार्तिक आर्यनबॉलिवूडसेलिब्रिटी