Sara Ali Khan : सारा सोबतचा तो 'मिस्ट्री मॅन' कोण ? कार्तिक आणि शुभमन नंतर साराच्या आयुष्यात नव्या मुलाची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 09:54 AM2023-01-03T09:54:14+5:302023-01-03T10:03:08+5:30
बॉलिवुड अभिनेत्री सारा अली खान आणि तिच्या रिलेशनशिप्सच्या चर्चा नेहमी सुरु असतात.
Sara Ali Khan : बॉलिवुड अभिनेत्री सारा अली खान आणि तिच्या रिलेशनशिप्सच्या चर्चा नेहमी सुरु असतात. सारा सध्या तिच्या मित्रांसोबत सुट्टी एंजॉय करत आहे. तिच्या शायरी अंदाजात तिने मित्र परिवारासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोंची सध्या तिच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
साराने इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड केले आहेत ज्यात एक मिस्ट्री मॅन दिसून येतोय. हा मिस्ट्री मॅन नेमका कोण असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. हा कार्तिक तर नाही ना अशी चर्चा आता सुरु झाली आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सारा मित्रांसोबत परदेशात आहे. तिथेच तिच्यासोबत हुडीने चेहरा झाकलेला एक मुलगा दिसतोय. तो कोण आहे याचा अंदाज आता चाहते बांधत आहेत.
सारा आणि अभिनेता कार्तिक आर्यनच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. दोघेही अनेकदा एकत्रर डेटवर जायचे, त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघेही 'लव्ह आज कल २' सिनेमाच्या शूटिंगवेळी एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र काही महिन्यातच दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर सारा आणि भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चाही मध्यंतरी रंगली. दोघांच्या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर कार्तिक सध्या हृतिक रोशनची बहिण पश्मिना रोशनसोबत असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये सुरु आहे.