Join us

आई अमृता सिंगच्या 'या' दोन सिनेमात सारा अली खानला करायचंय काम, तिनेच केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 18:30 IST

लवकरच सारा अली खान वरूण धवनसोबत ‘कुली नं.१’ च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

सारा अली खान वेगवेगळ्या कोणत्या कारणांमुळे बी- टाऊनमध्ये चर्चेत असते. सारा अली खान पहिल्याच सिनेमातून आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. साराने 'केदारनाथ'मधून डेब्यू केल्यानंतर रणवीर सिंगच्या अपोझिट 'सिम्बा'मध्ये तिची वर्णी लागली. सध्या साराकडे सतत सिनेमाच्या ऑफर्स येत आहेत. मात्र साराला आई अमृता सिंगच्या दोन सिनेमांमध्ये काम करायची इच्छा आहे.  

बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सारा म्हणाली, ''मला नाही वाटतात मी आई इतका चांगला अभिनय करु शकते. हा पण, मला तिच्या 'चमेली की शादी' आणि 'आईना'मध्ये तिने साकारलेल्या भूमिका करायला आवडतील. याशिवाय मला तिचा बेताब सिनेमा देखील आवडला होता. यात ती खूपच सुंदर दिसली होती.'' 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, लवकरच सारा अली खान वरूण धवनसोबत ‘कुली नं.१’ च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तर नव्या चित्रपटात वरूण धवन आणि सारा अली खान हे दोन कलाकार दिसतील. तसेच विनोदी कलाकार परेश रावळ, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे देखील दिसणार आहेत.

टॅग्स :सारा अली खान