Join us

VIDEO : कारमधून उतरून धावत गेली Sara Ali Khan, फोटोग्राफर्सना म्हणाली - तुम्ही फोटो काढताय, माझा फोन हरवलाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 11:26 IST

Sara Ali Khan : फोटोग्राफर्सना नेहमीप्रमाणे आनंदाने पोज देणारी सारा यावेळी फोटोग्राफर्सपासून पळताना दिसून आली. त्याला कारणही तसंच होतं.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) पापाराजींची फेव्हरेट आहे. सारा जिथेही जाते ते तिच्यामागे तिकडे पोहोचतात. शुक्रवारी सारा अली खान मुंबईच्या एका रेकॉर्डिंग स्टुडिओबाहेर दिसली होती. फोटोग्राफर्सना नेहमीप्रमाणे आनंदाने पोज देणारी सारा यावेळी फोटोग्राफर्सपासून पळताना दिसून आली. त्याला कारणही तसंच होतं.

हरवला साराचा फोन

सारा अली खानचा फोन हरवला होता, तरी फोटोग्राफर्स तिचे फोटो काढत होते. सारा तिच्या गाडीत बसली होती, तेव्हा तिला जाणीव झाली की तिचा फोन तिच्याकडे नाहीये. अशात ती गाडीतून बाहेर आली तर फोटोग्राफर्सनी तिला घेरलं. यावर सारा म्हणाली की, 'अरे मेरा फोन खो गया है'. साराचा यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओत बघू शकता की, सारा अली खान तिच्या कारमधून उतरते आणि म्हणते की, तिला फोन हरवला आहे. त्यानंतर ती स्टुडिओकडे वेगाने धावत जाते. जेव्हा ती परत येते तेव्हा फोटोग्राफर्स तिचे फोटो काढत असतात. तेव्हाही ती चिंतेत होती. ती म्हणाली की, 'अरे आप लोक फोटोज खींच रहे हो, यहां मेरा फोन गुम गया है'. 

दरम्यान साराने काही दिवसांपूर्वी बॉडीगार्डमुळे फोटोग्राफर्सची माफी मागितली होती. कारण साराच नवा सिनेमा 'अतरंगी रे'च्या गाण्याच्या लॉन्चवरून परत येत असताना तिच्या गार्डने एका व्यक्तीला धक्का दिला होता. याचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

टॅग्स :सारा अली खानबॉलिवूडसोशल व्हायरल