Join us

धार्मिक आस्थेवरुन टीका करणाऱ्यांना सारा अली खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 5:03 PM

सारा अली खान याच कारणाने सध्या तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) अनेकदा महादेवाचं दर्शन घेण्यासाठी कधी केदारनाथ तर कधी ओंकारेश्वर तर कधी अन्य ज्योतिर्लिंगांना भेटी देते. कोणी तिचं कौतुक करतं तर काही नेटकरी तिच्यावर टीकाही करतात. 'खान' आडनाव असूनही ती केदारनाथला जाते यावरुन तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.  आता या सर्व टीकाटिप्पणीवर सारा अली खान पहिल्यांदाच दिलखुलासपणे बोलली आहे. 

सारा अली खान ही सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे. सैफ आणि अमृताचा बऱ्याच वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला आहे. तर त्यांची लेक सारा ही मुस्लिम आणि हिंदू अशा दोन्ही धर्मांचं पालन करते. सध्या ती बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. धर्मावरुन होणाऱ्या टीकेवर सारा म्हणाली, "मला फरक पडत नाही. माझ्या धार्मिक आस्था, मी काय खाते, मी एअरपोर्टवर कशी जाते हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. यासाठी मला कधीच लाज वाट नाही."

ती पुढे म्हणाली, "मला या गोष्टींचा फरक पडत नाही. पण हा, जर प्रेक्षकांना माझं काम आवडलं नाही तर नक्कीच मला फरक पडतो. मला कधीच अन्यायाविरोधात आवाज उठवायची गरज पडली नाही कारण माझा बेमतलब बोलण्यावर विश्वास नाही. मी सेक्युलर कुटुंब आणि सोवेरियन, सेक्युलर, प्रजासत्ताक गणतंत्रात जन्माला आली आहे. उगाचच मला क्रांती करायची गरज पडली नाही. लोकांनी मला खूप पाठिंबा दिला. अन्यायाविरोधात मी स्वत:साठीच काय इतरांसाठीही उभी राहीन."

साराचे हेच विचार पाहून सध्या तरुणाई खूप प्रभावित झाली आहे. साराचा हा बिन्धास्तपणा सर्वांनाच आवडला आहे. साराचा आगामी 'ऐ वतन मेरे वतन' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होतोय. तिचा 'मर्डर मुबारक'ही नुकताच रिलीज झाला. सध्या ती आगामी 'मेट्रो इन दिनो' चं शूटिंग करत आहे. यामध्ये ती आदित्य रॉय कपूरसोबत झळकणार आहे.

टॅग्स :सारा अली खानबॉलिवूडमंदिरकेदारनाथट्रोलसोशल मीडिया