अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. सध्या ती कुटुंबासोबत वेळ व्यतित करते आहे. नुकतेच नेहमी हसत खेळणाऱ्या साराचा चिडलेला चेहरा लोकांसमोर आला. साराला राग तेव्हा आला जेव्हा ती एअरपोर्टवरून बाहेर पडत होती आणि त्यावेळी तिच्याजवळ एक व्यक्ती आला आणि त्याने मास्क खाली करून सेल्फी काढायला गेला. हे पाहून साराच्या खूप भडकली आणि रागाच्या भरात तिने त्याला चांगलेच खडेबोल सुनावले.
खरेतर सारा अली खान एअरपोर्टवरून बाहेर पडत होती. यावेळी तिने चेहऱ्याला शिल्ड आणि मास्क लावला होता. जशी ती एअरपोर्टच्या बाहेर पडली तेव्हा एक व्यक्ती तिच्याजवळ आला आणि मास्क काढून सेल्फी घेऊ लागला. या व्यक्तीचे वर्तणूक पाहून सारा खूप भडकली आणि तिने त्याला म्हटले की 'हे काय करतो आहेस ?'
त्यानंतर हात जोडून ती तिथे उभे असलेल्या लोकांना समजावू लागली की असे अजिबात केले नाही पाहिजे. हे म्हणत साराने पापाराझीला थँक्यू म्हणत आपल्या कारमध्ये बसली. साराचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर साराच्या काही चाहत्यांनी तिची नाराजी योग्य असल्याचे सांगितले. लोकांचे म्हणणे आहे की कोरोना काळात लोकांना समजले पाहिजे एखादी छोटीशी चूकदेखील त्याच्यासोबत दुसऱ्या व्यक्तीसाठी मोठी समस्या बनू शकते.