Join us

ओळखा पाहू कोण आहे ही अभिनेत्री, ती लहान असतानाच पालक झाले होते विभक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 18:36 IST

या अभिनेत्रीने काहीच महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून तिच्या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले आहे.

ठळक मुद्देफोटोत साराने तिच्या डोक्यावरून हूडी घेतली असून ओठांवर बोट ठेवले आहे. या तिच्या फोटोत तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. तिने एका या मासिकासाठी केलेले हे फोटोशूट असून हे तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

सारा अली खान सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर तिच्या फोटोशूटचे, हॉलिडेचे, चित्रपटाच्या सेटवरचे फोटो पोस्ट करत असते. तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला असून या फोटोत तिचा एक वेगळा अंदाज तिच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. 

या फोटोत तिने तिच्या डोक्यावरून हूडी घेतली असून ओठांवर बोट ठेवले आहे. या तिच्या फोटोत तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. तिने एल्ले या मासिकासाठी केलेले हे फोटोशूट असून हे तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. हा फोटो शेअर करताना साराने इन्स्टाग्रामला एक खूप छान कॅप्शनदेखील लिहिली आहे. तिने लिहिले आहे की, रिड माय लीप्स... देन रीड बीटवीन द लाइन्स... (मला काय म्हणायचे आहे हे ओळखा)

साराच्या या फोटोवर कार्तिक आर्यनने केलेली कमेंट सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कार्तिकने कमेंटमध्ये म्हटले आहे की, कही देखा देखा लगता है... त्याच्या या कमेंटवर 650 हून लोकांनी रिप्लाय दिला आहे. सध्या साराच्या चित्रपटांइतकेच तिचे खाजगी आयुष्य देखील चर्चेत आहे. सारा अली खान अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करत असल्याचे म्हटले जाते. त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात येते.   

सारा अली खान सध्या बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चांगले चित्रपट देत आहे. साराचे वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग हे दोघेही अतिशय प्रसिद्ध अभिनेते आहेत. साराने देखील तिच्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तिच्या केदारनाथ या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले. त्यानंतर सिम्बा या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले. लव्ह आज कल 2 आणि कुली नं 1 या चित्रपटांमध्ये ती लवकरच झळकणार असून तिचे फॅन्स तिच्या या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात आहेत. लव्ह आज कल 2 मध्ये कार्तिक आर्यनसोबत तर कुली नं 1 मध्ये वरुण धवनसोबत तिची जोडी जमणार आहे. 

टॅग्स :सारा अली खानकार्तिक आर्यन