Join us

कार्तिक आर्यन व सारा अली खान दिसले हॉस्पिटलबाहेर; हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 12:24 PM

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांची लव्हलाईफ सध्या जाम चर्चेत आहेत. सध्या दोघेही सर्रास एकत्र फिरताना दिसतात. नुकतेच हे कपल मुंबईच्या एका हॉस्पिटलबाहेर दिसले.

ठळक मुद्दे कार्तिक लवकरच ‘पति पत्नी और वो’चे चित्रीकरण झाल्यानंतर ‘भूल भुलैया’च्या रिमेकसाठी काम करणार आहे.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांची लव्हलाईफ सध्या जाम चर्चेत आहेत. सध्या दोघेही सर्रास एकत्र फिरताना दिसतात. नुकतेच हे कपल मुंबईच्या एका हॉस्पिटलबाहेर दिसले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सारा आणि कार्तिक हॉस्पिटलबाहेर दिसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. वेगवेगळे अंदाज बांधले गेलेत. पण आता याचे खरे कारण समोर आले आहे. 

होय, गेल्या काही दिवसांपासून कार्तिकचे वडील हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. त्यांना भेटण्यासाठीच कार्तिक व सारा दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले होते. अर्थात कार्तिकच्या वडिलांना कुठल्या कारणाने रूग्णालयात भरती करण्यात आले, याचा खुलासा मात्र अद्याप झालेला नाही.यावरून एक स्पष्ट आहे, ते म्हणजे सारा व कार्तिक एकमेकांबद्दल कमालीचे गंभीर आहेत. कार्तिकच्या कुटुंबाशी साराची वाढत असलेली जवळीक यावरून हे सिद्ध होतेय. काही दिवसांपूर्वी साराच्या रॅम्प डेब्यूवेळी कार्तिक आणि साराचा भाऊ इब्राहिम यांचे खास बॉन्डिंग दिसून आले होते. साराची आई अमृता सिंग यांच्यासोबतही कार्तिकची जवळीक वाढत आहे.

‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये साराने कार्तिकसोबत कॉफी डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून या दोघांची चर्चा सुरू झाली. त्यानंतर लोकमत स्टाईल अवार्ड सोहळ्यात रणवीर सिंगने सारा व कार्तिकची भेट घालून दिली होती. यानंतर कार्तिक व सारा ‘लव्ह आज कल 2; या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेत आणि दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडले.

 कार्तिक लवकरच ‘पति पत्नी और वो’चे चित्रीकरण झाल्यानंतर ‘भूल भुलैया’च्या रिमेकसाठी काम करणार आहे. तर सारा ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवनसह झळकणार आहे.

 

टॅग्स :कार्तिक आर्यनसारा अली खान