सारा अली खान भलेही नवाब सैफ अली खानची मुलगी आहे. पण सारा स्वत:ला ‘नवाब’ नाही तर ‘फकीर’ म्हणणे पसंत करते. होय, अलीकडे एका ताज्या मुलाखतीत सारा यावर बोलली. मी एका स्टारची मुलगी आहे तर खूप महागडे कपडे घालत असेल, असे अनेकांना वाटत असेल तर असे काहीही नाही. आता हिरोईन बनले म्हणून मला सांगितले जातात, तेच कपडे मला घालावे लागतात. पण चित्रपटात येण्यापूर्वी माझा कुठलाही ड्रेस हजार रूपयांपेक्षा महाग नसायचा. माझे सगळे शॉपिंग दिल्लीच्या शंकर मार्केटमधून होते. अलीकडे मी हैदराबादला गेले होते. तेथे मॉमसोबत मीना बाजारातही शॉपिंग केले. लोक कपड्यांवर इतके पैसे कसे खर्च करतात, हेच मला कळत नाही. मी मात्र असे करू शकत नाही, असे सारा यावेळी म्हणाली.मी कपडे रिपीट करते, असे लोक मला म्हणतात. तर हो, मी कपडे रिपीट करते. मला कुठलेही सेलेब स्टेटस नकोय. मला लोक ‘फकीर’ समजत असतील तर खुश्शाल समजोत. माझ्या मॉमने नेहमी आम्हाला दुस-यांची मदत करण्याची शिकवण दिली आहे. उगीच दिखावा, बडेजाव करू नका. लोकांना दाखवण्यासाठी पैसा खर्च करण्यापेक्षा एखाद्या गरजूची मदत करा, असेचं तिने आम्हाला शिकवले. कपड्यांवरून माणसांची पारख होते, हे मला अजिबात मान्य नाही. अभिनय हे माझे काम आहे. पण माणुसकी जपण्याचा मी कायम प्रयत्न करेल. वेगवेगळ्या शहरात जाणे, लोकांशी गप्पा मारणे, गल्लीबोळातील दुकानात जाऊन खरेदी करणे हे सगळे मी खूप एन्जॉय करते, असेही साराने यावेळी सांगितले.साराचा ‘केदारनाथ’ हा डेब्यू सिनेमा येत्या ७ डिसेंबरला प्रदर्शित होतोय. यानंतर ‘सिम्बा’ या चित्रपटात ती रणवीरसोबत झळकणार आहे. हा चित्रपट २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
हो, मी कपडे रिपीट करते...! कपड्यांवर बोलली सारा अली खान!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 12:37 PM
लोक कपड्यांवर इतके पैसे कसे खर्च करतात, हेच मला कळत नाही. मी मात्र असे करू शकत नाही, असे सारा यावेळी म्हणाली.
ठळक मुद्दे वेगवेगळ्या शहरात जाणे, लोकांशी गप्पा मारणे, गल्लीबोळातील दुकानात जाऊन खरेदी करणे हे सगळे मी खूप एन्जॉय करते, असेही साराने यावेळी सांगितले.