Join us

नववर्षाच्या पहिल्या सोमवारी सारा खान गेली शंकराच्या देवळात, श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योर्तिलिंगाचं घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:35 IST

बॉलिवूड अभिनेत्री सारा खानही २०२५च्या पहिल्या सोमवारी शिवभक्तीत लीन झालेली पाहायला मिळाली.

२०२५ वर्ष सुरू होऊन आता एक आठवडा झाला आहे. सेलिब्रिटींनी मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं. अनेकांनी त्यांचे नववर्षाचे संकल्पही सांगितले. काही सेलिब्रिटींनी देवदर्शनाने नववर्षाची सुरुवात केली. बॉलिवूड अभिनेत्री सारा खानही २०२५च्या पहिल्या सोमवारी शिवभक्तीत लीन झालेली पाहायला मिळाली. 

सारा खान ही बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. अनेकदा सारा देवदर्शनला जाताना दिसते. आताही नववर्षाची सुरुवात तिने भगवान शंकराच्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन केली आहे. साराने २०२५ च्या पहिल्या सोमवारी आंध्र प्रदेशातील श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. "साराचा पहिला सोमवार...जय भोलेनाथ" असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 

साराने 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमाने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. नंतर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये ती काम करताना दिसली. 'ए वतन मेरे वतन' या सिनेमात ती गेल्या वर्षी दिसली होती. आता सारा 'स्काय फोर्स' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून येत्या २४ जानेवारीला सिनेमा रिलीज होणार आहे. 

टॅग्स :सारा अली खानसेलिब्रिटी