'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३' (Cannes Film Festival 2023) ला सुरुवात झाली आहे. अनेक बॉलिवूड तारे तारका रेड कार्पेटवर फॅशनचा जलवा दाखवणार आहेत. अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) कान्स रेड कार्पेटवर पदार्पण केलंय. वेस्टर्न लुक सोडून साराने देसी लेहेंग्यात रेड कार्पेटवर एंट्री घेत सर्वांचंच लक्ष वेधलं. मात्र काही नेटकऱ्यांनी तिच्या लुकवरुन तिला ट्रोलही केलं आहे.
प्रसिद्ध भारतीय डिझायनर अबू जानी-संदीप खोसला यांनी डिझाईन केलेल्या व्हाईट लेहेंग्यात सारा अली खानने कान्स रेड कार्पेटवर एंट्री केली. तिचा हा देसी लुक खूपच सुंदर दिसत होता. कमीत कमी मेकअप आणि हेवी आऊटफिट तिच्या सौंदर्यात भर घालत होते. तर ड्रॉप इअररिंग्सने तिचा लुक पूर्ण केला.
एकीकडे साराच्या या देसी अवताराचं कौतुक होत असतानाच काही जणांनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. भारतात कोणत्याही सणासुदीला किंवा लग्नाला भरजरी लेहेंग्यात दिसणारे हे सेलिब्रिटी तिकडे जाऊनही लेहेंगाच परिधान करतात यावर नेटकरी चिडले. 'लग्नाला गेली आहेस का' असं म्हणत साराला ट्रोल करण्यात आलं.