बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून बऱ्याच नव्या चेहऱ्यांचं पदार्पण झाल्याचं पाहायला मिळालं. या नव्या चेहऱ्यांमध्ये प्रसिद्धीझोतात आलेलं एक नाव म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन याचं. 'सोनू के टिटू की स्वीटी' या चित्रपटामुळे कार्तिक खऱ्या अर्थाने एक अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. तो इंडस्ट्रीत स्थिरावत नाही तोच त्याच्याबद्दलच्या अफवांनी जोर धरला आहे. सारा अली खान आणि अनन्या पांडे यांच्यासोबत तो नात्यात असल्याच्या या अफवा आहेत.
अभिनेत्री सारा अली खान हिने कार्तिक आपला क्रश असल्याचं सांगितलं होतं. ज्यानंतर पुढे कार्तिक आणि साराची भेट घडली. पाहता पाहता त्यांना एकत्र चित्रपटात काम करण्याची संधीही मिळाली. किंबहुना त्यांच्या आगामी चित्रपटापेक्षा त्यांच्यात असणाऱ्या नात्याचीच जास्त चर्चा होऊ लागली. एकिकडे कार्तिक आणि अनन्या यांच्या नात्यांच्या अफवा उठल्या तर, दुसरीकडे 'स्टुडंट ऑफ द इयर २' फेम अभिनेत्री अनन्या पांडे हिचंही नाव कार्तिकशी जोडलं गेलं. या दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आणि या अफवांनी अधिक जोर धरला. अजूनतरी त्या तिघांकडूनही कुठलीही माहिती मिळालेली नाहीये. पण, कार्तिककडून लवकरच काहीतरी स्टेटमेंट येईल यात काही शंका नाही.