Join us

सारा अली खान नव्हे 'सारा सुल्तान', अभिनेत्रीच्या आडनावावरुन रंगली चर्चा; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 09:51 IST

सारा अली खानच्या पदवी प्रदान सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल, सारा सुल्तान नाव घेऊन स्टेजवर बोलवण्यात आलं.

बॉलिवूडमधली सध्याची अनेकांची लाडकी अभिनेत्री म्हणजे सारा अली खान (Sara Ali Khan). फक्त स्क्रीनवरच नाही तर साराने खऱ्या आयुष्यातही प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सेलिब्रिटी असूनही तिचा साधेपणा लोकांना खूप आवडतो. 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या साराने आता तिचा चांगला जम बसवला आहे. मात्र सध्या तिच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये तिच्या आडनावावरुन चर्चा सुरु झाल्या आहेत. सारा अली खान असं नाव न घेता तिचं भलतंच आडनाव घेतल्याचं व्हिडिओत पाहायला मिळतंय.

हा व्हिडिओ २०१३ चा आहे. यामध्ये पदवी प्रदान सोहळ्यात साराला सर्टिफिकेट घेण्यासाठी स्टेजवर बोलावण्यात येते. नीता अंबानी आणि आमिर खान यांच्याहस्ते तिला पदवी मिळते. तेव्हा तिचं आडनाव सारा अली खान न घेतला 'सारा सुल्तान' असं घेतलं जातं. तिला 'सारा सुल्तान' अशी हाक का मारण्यात आली असाच प्रश्न नेटकऱ्यांना पडला. व्हिडिओत तिची आई अमृता सिंह आणि वडील सैफ अली खानही आहे. दोघांनाही लेकीला पदवी घेताना पाहून गर्व वाटत आहे. साराने इतिहास आणि राज्यशास्त्रमध्ये पदवी घेतली आहे. कोलंबिया विद्यापिठातून तिला ही पदवी मिळाली आहे. 

'सारा सुल्तान'च्या नावामागचा किस्सा 

साराने एका मुलाखतीत सांगितले होते की, अमेरिकेत विमानतळ अधिकारी नेहमीच तिच्या सध्याच्या दिसण्यावरुन आणि आधीच्या दिसण्यावरुन चौकशी करायचे. कारण तिचं आधी वजन तब्बल ९६ किलो होतं. त्यामुळे आता ती वजन कमी केल्यानंतर फार वेगळी दिसते. तिच्याकडे एक स्टुडंट व्हिसा आणि एक नियमित व्हिसासह आणखीही अनेक व्हिसा आहेत. यामुळे कधी कधी अधिकारी तिच्यावर संशय घ्यायचे. तिच्या स्टुडंट व्हिसावर सारा अली खान नसून सारा सुल्तान असं आहे.

वर्कफ्रंट

सारा दोन चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहे. 'ए वतन मेरे वतन' आणि 'मर्डर मुबारक' या दोन्हीमध्ये तिची भूमिका आहे. तर 'मेट्रो इन दिनो' सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. यामध्ये ती आदित्य रॉय कपूरसोबत झळकणार आहे.

टॅग्स :सारा अली खानबॉलिवूडसोशल मीडिया