Join us

असा असणार विकी कौशलचा सरदार उधम सिंगमधील लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 2:04 PM

विकी सध्या सरदार उधम सिंग या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून त्याला सेट पीटर्सबर्ग येथे नुकतेच या चित्रपटाच्या लूकमध्ये पाहाण्यात आले.

ठळक मुद्देविकीची या चित्रपटातील हेअरस्टाईल खूप वेगळी असून त्याच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला एक व्रण दिसून येत आहे. तसेच त्याने ओव्हरकोट घातलेला आहे. त्याच्या आजूबाजूला व्हिंटेज कार दिसत असून एक रशियन स्त्री देखी आपल्याला दिसत आहे. 

राजी आणि संजू या चित्रपटातील विकी कौशलच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. पण उरीः द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या यशानंतर तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माते त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुकत आहेत. दिग्दर्शक शूरजित सरकारच्या सरदार उधम सिंगमध्ये आता विकी झळकणार असून या चित्रपटातील त्याची भूमिका खूपच वेगळी आहे. सरदार उधम सिंग हा चित्रपट भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच्या काळातील आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशाच एका स्वातंत्र्य सैनिकाची गोष्ट आपल्याला सरदार उधम सिंग या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटातील विकीचा लुक कसा असणार याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. 

विकी सध्या सरदार उधम सिंग या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून त्याला सेट पीटर्सबर्ग येथे नुकतेच या चित्रपटाच्या लूकमध्ये पाहाण्यात आले. विकीची या चित्रपटातील हेअरस्टाईल खूप वेगळी असून त्याच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला एक व्रण दिसून येत आहे. तसेच त्याने ओव्हरकोट घातलेला आहे. त्याच्या आजूबाजूला व्हिंटेज कार दिसत असून एक रशियन स्त्री देखी आपल्याला दिसत आहे. विकीनेच त्याचा या चित्रपटाचा लूक इन्स्टाग्रामला शेअर केला आहे.

सरदार उधम सिंग या चित्रपटात उधम सिंगची व्यक्तिरेखा पहिल्यांदा इरफान खान साकारणार होता. पण इरफानने आजारपणामुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यामुळे या भूमिकेसाठी विकीची निवड करण्यात आली. 

या चित्रपटातील मुख्य भूमिकेत विकीची निवड करण्याविषयी या चित्रपटाचे दिग्दर्शक शूजीत सरकार सांगतात, विकीच्या आजवरच्या कारकिर्दीकडे तुम्ही पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की तो नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याला प्राधान्य देतो. या भूमिकेसाठी पूर्णपणे झोकून देईल असा कलाकार मला या चित्रपटासाठी हवा होता आणि त्यात या चित्रपटात एका पंजाबी मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे आणि विकी हा पंजाबी आहे. याच कारणांमुळे मी या भूमिकेसाठी विकीला घेण्याचे ठरवले. 

शूजीत सरकारसोबत काम करायला मिळत असल्याने विकी सध्या चांगलाच खूश आहे. तो सांगतो, शूजीत यांच्यासोबत काम करणे हे माझ्यासाठी एक स्वप्न होते. त्यांचे चित्रपट, त्यांचे काम याच्या मी अनेक वर्षांपासून प्रेमात आहे. त्यामुळे शूजीत यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणे हे माझ्यासाठी खूप खास आहे.  

टॅग्स :विकी कौशल