प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर सरोज खान यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सरोज खान यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला.सरोज यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक बड्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवले. अनेक सेलिब्रेटींनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे देखील सरोज खान यांच्या निधनामुळे भावूक झाले आहेत.
धर्मेंद्र यांनी ट्विटरवर लिहिले, ''तुझ्या येण्याने एक वेगळी चमक यायची. अफसोस..तू पण गेलीस, तुझ्या आत्माला शांती लाभो. मित्रांनो, माझ्या पहिला सिनेमा 'दिल भी तेरा'ची ती सहायक नृत्य दिग्दर्शक होती. एकआनंदी मैत्रिण.'' अशा शब्दात धर्मेंद्र यांनी सरोज खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
तीन दिवसानंतर सरोज यांची प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे. सरोज खान यांना गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणीही घेण्यात आली होती. पण ही चाचणी निगेटिव्ह आली होती. तेव्हापासून त्या रुग्णालयातच दाखल होत्या. दरम्यान, प्रकृती अधिकच खालावल्यानंतर आज सरोज खान यांचं निधन झालं आहे.