बॉलिवूडची प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांनी वयाच्या 71व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. कार्डिएक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सरोज खान बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरियोग्राफर होत्या, त्यांनी जवळपास दोन हजारांहून जास्त गाण्यांची कोरियोग्राफी केली होती. त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. मात्र उतारवयात त्यांना काम मिळत नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला होता. 2018 साली त्यांना ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये काम मिळाले होते पण हा सिनेमा त्यांच्या हातातून गेला. यासाठी सरोज खान यांनी कतरिना कैफला जबाबदार ठरविले होते.
सरोज खान यांनी त्यावेळी एका मुलाखतीत सांगितले की, कतरिना कैफने सराव न करता गाण्यावर काम करण्यासाठी नकार दिला होता. त्या म्हणाल्या होत्या की, आता डान्सची परिस्थिती पाहता मला इंडस्ट्रीसाठी काही चांगले करायचे होते. मी कोणत्या एक्ट्रेसला जज करू शकत नाही कारण मी पण तेच पाहिले. जे इतर कोरियोग्राफरने केलेले असते. कतरिना चांगली दिसते आणि ठग्स ऑफ हिंदोस्तानच्या वेळी तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. पण जसे शूट सुरू होणार होते. तिने निर्मात्यांना सांगितले की रिहर्सल शिवाय ती हे गाणं करणार नाही आणि माझे काम प्रभूदेवाला देण्यात आले.