किंगखान शाहरुख खानच्या फिल्मी करिअरला सध्या ओहोटी लागलीय. पण म्हणून किंगखानची डिमांड जराही कमी झालेली नाही. विश्वास बसत नसेल तर ही ताजी बातमी वाचाच. ऐकून आश्चर्य वाटेल, पण शाहरूखच्या चित्रपटांचे राईट्स अर्थात चित्रपटांचे हक्क कोट्यवधी रूपयांना विकले गेले आहेत. ही आत्तापर्यंतची सर्वांत मोठी सॅटेलाईट डिल असल्याचे म्हटले जात आहे.डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, चाहत्यांमध्ये अद्यापही शाहरूखच्या चित्रपटांबद्दलचे क्रेज कायम आहे. टीव्हीवर त्याचे चित्रपट जबरदस्त टीआरपी मिळवतात. हेच कारण आहे की, शाहरूखच्या २२ सुपरहिट चित्रपटांचे सॅटेलाइट हक्क कोट्यवधी किंमतीला विकले आहेत.
या २२ चित्रपटांमध्ये चमत्कार, पहेली, स्वदेश, ओम शांती ओम, दिलवाले, फिर भी दिल है हिंदुस्तानी, चेन्नई एक्स्प्रेस, हॅपी न्यू ईअर, राम जाने अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट खासगी वाहिनीवर पाहायला मिळतील. ही डिल किती कोटींत झाली, हे कळू शकलेले नाही. पण यातील बराच मोठा नफा शाहरूखला मिळणार आहे.