Join us  

Satish Kaushik यांच्या मृत्यूप्रकरणी नवा खुलासा, फार्म हाऊसवर पोलिसांना सापडली काही 'संशयास्पद,औषधे'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 10:22 AM

सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

बॉलिवूडचे अष्टपैलू अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे यापूर्वी आकस्मिक निधन झाले. सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत होते. त्याचवेळी याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आहे.

एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, दिल्ली पोलिसांच्या पथकाने फार्म हाऊसवर जाऊन तपासणी केली असता काही 'संशयास्पद औषधे' पोलिसांना सापडली. यानंतर पोलीस सतीश कौशिक आता पोस्टमॉर्टम आणि व्हिसेरा रिपोर्टची वाट पाहत आहेत. त्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

होळी पार्टीसाठी आलेल्यांची यादी पोलिसांनी केली तयार यासोबतच पोलिसांनी होळी पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांची यादीही तयार केली आहे, जे त्यावेळी फार्महाऊसमध्ये उपस्थित होते. सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या उद्योगपतीचीही पोलिसांना चौकशी करायची आहे. पोलिसांच्या तपासात फॉर्म हाऊसमध्ये सापडलेली संशयास्पद औषधांची पाकिटे कोणासाठी आणि कशासाठी आली होती, याचाही शोध घेण्यात येत आहे. त्याचा सतीश कौशिक यांच्याशी काही संबंध होता का?

होळीपार्टीसाठी आले होते दिल्लीत  सतीश कौशिक दिल्लीतील एका मित्राच्या फार्म हाऊसवर होळी पार्टीसाठी आले होते. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला.  सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.  

टॅग्स :सतीश कौशिकपोलिस