सतीश कौशिक यांचा लेकीसोबतचा रूग्णालयातील हा फोटो पाहून तुम्ही सुद्धा व्हाल भावुक!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 01:40 PM2021-04-02T13:40:03+5:302021-04-02T13:41:10+5:30
Satish Kaushik : माझी प्रकृती वेगाने सुधारतेय. वंशिकाही आधीपेक्षा खूप बरी आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रार्थनांसाठी आभार, म्हणत शेअर केली पोस्ट
सध्या बॉलिवूड इंडस्ट्री कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. बॉलिवूडचे अनेक स्टार्स कोव्हिड 19 चे (Covid 19) शिकार ठरलेत. यापैकीच एक म्हणजे, अभिनेते सतीश कौशिक. काही दिवसांपूर्वी सतीश यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुकतेच सतीश कौशिक (Satish Kaushik) घरी परतले. पण ते घरी परतताच त्यांची 10 वर्षाची लेक वंंशिकात कोरोनासदृश लक्षणे आढळली. शिवाय ताप न उतरल्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. ती अजूनही रूग्णालयात आहे. तिच्या काळजीने सतीश अस्वस्थ झाले होते. (Satish Kaushik share photo with daughter Vanshika)
आता सतीश यांनी वंंशिकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तुम्हीही भावूक व्हाल. कदाचित हा फोटो हॉस्पीटलमधील आहे. फोटोत बाप-लेक खिडकीतून बाहेर बघत आहेत. त्यांच्यामागे बेड आहे. हा फोटो शेअर करताना सतीश यांनी लिहिलेय, ‘बाबा व त्यांची लेक कोव्हिडी फ्री जगाची कामना करतात. धन्यवाद, हा फार लहान शब्द आहे. संकटाच्या काळात तुमचे मित्र तुमच्या पाठीशी उभे होतात तेव्हा खूप बळ येते. माझी प्रकृती वेगाने सुधारतेय. वंशिकाही आधीपेक्षा खूप बरी आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रार्थनांसाठी आभार.’ या पोस्टमध्ये सतीश यांनी शबाना आझमी, अनिल कपूर, अनुपम खेर, जावेद अख्तर यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांना टॅग करत त्यांचे आभार मानले आहेत.
56 व्या वर्षी झाली मुलगी
अभिनेता सतीश कौशिक हे 56 व्या वर्षी बाबा झाले होते. सरोगसीद्वारे 2012 मध्ये वंशिकााचा जन्म झाला. वंशिकाच्या आधी सतीश यांना एक मुलगा झाला होता. मात्र दोन वर्षांचा असताना त्याचे निधन झाले. त्याच्या नंतर सरोगसीच्या मदतीने सतीश आणि त्यांची पत्नी शशि कौशिक यांना पुन्हा एकदा पालकत्वाचे सुख मिळाले.
वंशिकामध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यानंतर तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तिची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली. पण तिचा ताप मात्र वाढत होता. फोनवरून लेकीचा रडण्याचा आवाज ऐकून सतीश कौशिक यांचे काळीज तुटत होते. माझ्याया लेकीसाठी प्रार्थना करा, असे सतीश कौशिक यांनी म्हटले होते.