अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्ताने त्यांचे आदर्श आणि योगदानाबाबत आठवणी शेअर केल्या. सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. तेच शाहरूख खानने सुद्धा गांधी जयंती निमित्ताने एक पोस्ट शेअर करत वाईट न बोलणे, वाईट न बघणे आणि वाईट न ऐकण्याचं सांगितलं. शाहरूख खानच्या या पोस्टवर त्याची 'फॅन'मधी को-स्टार सयानी गुप्ताने त्याला टोमणा लगावला. ती म्हणाली की, गांधीजींनी आपल्याला हेही शिकवलं की, सत्य बोललं पाहिजे.
शाहरूख खानने लिहिला गांधीजींचा संदेश
शाहरूख खानने त्याच्या ट्विटर हॅंडलवर एक मोनोक्रोम फोटो शेअर केलाय. ज्यात त्याने संदेश दिला की, वाईट बघू नका, वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका. यासोबतच त्याने लिहिले की, 'या गांधी जयंतीला जर आपल्याला आपल्या मुलांना काही शिकवायचं असेल किंवा सांगायचं असेल जे त्यांच्या चांगल्या-वाईट वेळेत कामात येईल तर ते हे आहे बुरा मत सुनो, बुरा मत देखो और बुरा मत बोलो।'
सयानी गुप्ता म्हणाली पीडितांबाबत आवाज उठवला पाहिजे
शाहरूख खानचं हे ट्विट रिट्विट करत सयानी गुप्ताने लिहिले की, 'खरं तर बोलायलाच पाहिजे. गांधीजींनी आपल्याला हेही शिकवलं की, सत्यासाठी बोललं पाहिजे. पीडितांसाठी आवाज उठवला पाहिजे. दलित भाऊ-बहिणींच्या हक्कांसाठी बोललं पाहिजे. केवळ डोळे आणि कान बंद करू नये'.
सयानी गुप्ताने तिच्या ट्विटमध्ये शाहरूख खानला टॅग करणं आणि दलित शब्दांचा वापर करणं हे दाखवतं की, ती हाथरस केसवरून शाहरूख खानच्या मौनावर खूश नाही. हाथरस केसबाबत अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपला संताप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलाय.