लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आज मंगळवारी केलेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळून लावली. अद्याप हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडून पास झालेला नाही. त्यामुळे चित्रपटासंदर्भात हस्तक्षेप करणे घाईचे ठरेल. ‘पीएम नरेंद्र मोदी’ येत्या ११ एप्रिलला प्रदर्शित झाल्यास आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल काय? याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केले. त्यामुळे हा चित्रपट येत्या ११ एप्रिलला रिलीज होतो की नाही, हा सस्पेन्स कायम आहे.
‘पीएम नरेंद्र मोदी’: सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, आता चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 1:57 PM
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी असलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
ठळक मुद्दे‘पीएम नरेंद्र मोदी’ हे बायोपिक दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी दिग्दर्शित केले आहे. विवेक ओबेरॉय यात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.