Join us

'स्कॅम १९९२' फेम प्रतिक गांधी दिसणार या चित्रपटात, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 6:23 PM

'शिम्मी' चित्रपटात बापलेकीची कथा रेखाटण्यात आली आहे.

मिनिटीव्ही या अमेझॉनच्या मोफत एंटरटेंमेंट व्हिडिओ सेवेच्या माध्यमातून आपल्याला भारतातल्या मोठ्या सिख्या एंटरटेंमेंट या निर्मिती संस्थेने तयार केलेल्या अनेक शॉर्ट फिल्म्स बघता येणार आहेत. या निर्मिती संस्थेच्या समन्वयाने निर्माण केलेल्या शिम्मी या प्रतिक गांधी याची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन १७ सप्टेंबर २०२१ ला मिनीटीव्ही या अमेझॉनच्या खरेदी अॅपवर होणार आहे. भारतातील लाखो प्रेक्षकांना मोफत पाहता येणाऱ्या अनेक आगामी चित्रपटांची घोषणा येत्या काही महिन्यांत करण्यात येणार आहे. 

शिम्मी ही  जिला आपल्या आयुष्यात नेमके काय चुकते आहे हे कळत नसलेल्या एका तरुण मुलीच्या (चाहत तेवानी) आणि तिच्या वडिलांच्या (प्रतिक गांधी). आयुष्याची गोष्ट आहे. या चित्रपटात भामिनी ओझा गांधी यांचीदेखील महत्वपूर्ण भूमिका आहे.

अ डेथ इन द गंज या चित्रपटाची सहलेखिका आणि भारतीय रॅपर नेझी याच्यावर आधारित ‘बोम्बे ७०’ या पुरस्कारप्राप्त माहितीपटाची लेखिका व दिग्दर्शिका असलेल्या दिशा नोयोनिका रिन्दानी यानी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. पगलेट, द लंचबॉक्स आणि मसान सारख्या काही नावाजलेल्या चित्रपटाचे निर्माते असलेल्या गुणित मोंगा आणि अचिन जैन यांच्या सिख्या एंटरटेंमेंट अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती झाली आहे.

सिख्या एंटरटेंमेंट ही निर्मिती संस्था चांगल्या कथा असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीला हातभार लावणारी संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या निर्मितीतून साकार झालेले अनेक चित्रपट मिनीटीव्हीच्या प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

टॅग्स :स्कॅम १९९२