"द माइंडलँड' वेबसीरीजचा दुसरा भाग प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 05:11 PM2018-10-24T17:11:53+5:302018-10-24T17:18:57+5:30
'द माइंडलँड' अनेक फेस्टिवल्समध्ये पारितोषिक मिळवल्यावर या वेबसिरिजचा आता भाग दोन प्रदर्शित होत आहे.
वेबसिरिजच्या या जमान्यात अनेक वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. नामांकित कलाकार ही यामध्ये आपले नशीब आजमावत आहेत. अशीच एक वेबसीरीज फ्रेमफायर स्टुडिओ निर्मित 'द माइंडलँड' ही गेल्यावर्षी प्रदर्शित करण्यात आली होती. अनेक फेस्टिवल्समध्ये पारितोषिक मिळवल्यावर या वेबसिरिजचा आता भाग दोन प्रदर्शित होत आहे. विजय शिंदे निर्मित असलेल्या या वेबसिरिजचे लेखन आणि दिग्दर्शन अभिजित पवार यांनी केले आहे.
https://www.youtube.com/channel/UC86QG5FvRncc6p1YKB5nB1Q
मानवी मनाचा भास आणि त्याचा आढावा घेणाऱ्या या तीन एपिसोडच्या वेबसिरिजमध्ये जयवंत वाडकर, प्रणव रावराणे, अरुण होर्णेकर, ओम जंगम, उज्वल धनगर, सिद्धेश नलावडे यासारख्या नामांकित कलाकारांनी काम केले आहे. फ्रेमफायर स्टुडिओ आपल्या नवनवीन प्रयोगासाठी, उपक्रमासाठी नेहमी कार्यरत असते. यावेळेस या प्रोजेक्टसाठी फ्रेमफायर स्टुडिओसोबत भ्रम प्रोडक्शनचे ही त्यांना सहकार्य लाभले. या सीझनच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाले तर हा सीझन हिंदी भाषेमध्ये चित्रित करण्यात आला आहे. यूट्यूब वर प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षकांची मागणी लक्षात घेता हा प्रयोग करण्यात आल्याचे स्टुडिओकडून सांगण्यात आले आहे. या वेबसिरिज आनंद घेण्यासाठी यूट्यूब वर फ्रेमफायर स्टुडिओ चॅनेलला नक्की सब्स्क्राइब करण्याचे आवाहन टीम तर्फे करण्यात येत आहे