Join us  

पाहा चित्रपटसृष्टीत येण्याआधी अशी दिसायची बिपाशा बासू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2017 5:12 PM

मॉडेलिंगकडून अभिनय क्षेत्राकडे वळलेली बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू हिचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसातच्या निमित्ताने तिची बहीण विजेताने बिपाशाचा ...

मॉडेलिंगकडून अभिनय क्षेत्राकडे वळलेली बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू हिचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसातच्या निमित्ताने तिची बहीण विजेताने बिपाशाचा एक रेअर फोटो शेअऱ केला आहे. 7 जानेवारी 1979 रोजी दिल्लीत तिचा जन्म झाला. बिपाशाचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील नेहरु प्लेसस्थित एपीजे हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय कोलकातामध्ये शिफ्ट झाले. गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. 2001मध्ये 'अजनबी' या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2002 मध्ये रिलीज झालेला 'राज' हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता. या सिनेमासाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत तिला नामांकन मिळाले होते. त्यानंतर 2005 मध्ये आलेला नो एन्ट्री हा सिनेमासुद्धा हिट ठरला होता. बिपाशाने आत्तापर्यंत जवळजवळ 55 सिनेमांमध्ये अभिनय केला.बालपणी लठ्ठ आणि सावळी होती बिपाशा...आज बिपाशाची गणना सेक्सी आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये होते. मात्र बालपणी बिपाशा सावळी आणि बरीच लठ्ठ होती. एकदा बिपाशाने सांगितले होते, की तिच्या शॉर्ट आणि कमांडिंग पर्सनॅलिटीला बघून लोक तिला घाबरायचे. प्रेमाने लोक तिला लेडी गुंडा म्हणायचे. बिपाशाचे वडील एक सिव्हिल इंजिनियर असून त्यांची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. बिपाशाचे शालेय शिक्षण कोलकाता येथील गंगाबक्स कनोरिया विद्या मंदिरातून झाले. तिच्या कुटुंबात वडील हीरक बसू, आई ममता बसु, मोठी बहीण बिदिशा आणि धाकटी बहीण बिजेता आहे. अभिनेत्रीसोबतच बिपाशा एक यशस्वी मॉडेलसुद्धा आहे. बातम्यांनुसार, बिपाशाचे मॉडेलिंग क्षेत्रातील पदार्पणाचे श्रेय अभिनेता अर्जुन कपूरची पत्नी आणि माजी सुपरमॉडेल मेहेर जेसियाला जाते. कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये बिपाशा आणि मेहेरची भेट झाली होती. तेव्हा मेहेरनेच बिपाशाला मॉडेलिंग क्षेत्राचा विचार करण्याचा सल्ला दिला होता. मेहेरच्या सल्ल्यानुसार बिपाशा या क्षेत्राकडे वळली आणि यश प्राप्त केले. या क्षेत्रात येऊन तिने यश मिळवले. 1996मध्ये तिने 'गोदरेज सिंथोल' सुपरमॉडेल कॉन्टेस्ट आणि 'द फोर्ड मॉडेल्स सुपरमॉडेल ऑफ द ईअर' स्पर्धा जिंकली होती.