Join us  

बघा, पण दाखवू नका...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2016 9:05 AM

निहलानींच्या चित्रपटात तर प्रणयप्रसंग ठरलेलेच असायचे. त्यांचा असा दुटप्पीपणा दर्शवणारे हे काही सीन्स आणि गाणी

सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष झाल्यापासून पहलाज निहलानी चित्रपटांवर बेछूटपणे कात्री चालविण्यासाठी नेहमीच वादात असतात.मग ते भारताच्या तरुणांना संस्कारक्षम करण्यासाठी चित्रपटात काय दाखवायचे आणि काय नाही हे ठरवणाऱ्या गाईडलाईन्स असो किंवा ‘स्पेक्टर’ या बाँडपटातील किसिंग सीनच लांबी कमी करायचा निर्णय असो किंवा ‘द जंगल बुक’ला ‘ए’ सर्टिफिकेट देणे असो.आता तर त्यांनी कहरच केला होता. शाहीद कपूरच्या ‘उडता पंजाब’ चित्रपटात एक-दोन नाही तर फिल्मच्या नावापासून तब्बल ८९ कट्स त्यांनी सुचवले. त्यावरून माजलेल्या प्रचंड गदारोळातही निहलानी आपला ‘संस्कारक्षम’ अजेंडा रेटत राहिले.सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होण्याआधी निहलानींनी निर्माता म्हणून ऐंशी-नव्वदच्या दशकात अनेक सुमार दर्जाचे चित्रपट तयार केले आहेत. चंकी पांडेला ब्रेकदेखील त्यांनीच दिला आहे.त्यांच्या चित्रपटाची खासियत म्हणजे द्विअर्थी संवाद व गाणी. ‘निहलानींच्या चित्रपटात तर प्रणयप्रसंग ठरलेलेच असायचे. त्यांचा असा दुटप्पीपणा दर्शवणारे हे काही सीन्स आणि गाणी 1. ये माल गाडी, तु धक्का लगा (अंदाज)यापेक्षा अश्लिल गाणे असू शकते का असा प्रश्न तुम्हाला पडेल. ‘ये माल गाडी तु धक्का लगा, गरम हो गया इंजिन इसका, तु धक्का देता जा’ अशा ओळी सेन्सॉर का करू नये? आणि गाण्यातील डान्स स्टेप तर कहरच! कॅमेऱ्या कलाकारांच्या कंबरेवर जास्त फोकस करताना दिसतो.2. लाल दुपट्टेवाली (आंखे) :‘इल्जाम’ चित्रपटातून गोविंदाला निहलानींनी गोविंदाला चित्रपटसृष्टीत आणले. पुढे त्यांनी गोविंदाला घेऊन ‘शोला और शबनम’ आणि ‘आंखे’ यांसारखे चित्रपट काढले. आंखे चित्रपटातील ‘लाल दुपट्टेवाली’ या गाण्यात ‘हर अजनबी के लिए ये खिडकी नहीं खुलती’ या ओळींवर दोन्ही नायिका ज्या प्रमाणे स्कर्ट वर करण्याची ‘अ‍ॅक्शन’ करतात, हे गाणे खरोखरंच सेन्सॉर झाले पाहिजे होते.3. खडा है, खडा है (अंदाज) :अनिल कपूर-जुही चावला स्टारर ‘अंदाज’ चित्रपटातील या गाण्याच्या शब्दांतच सर्व काही आहे. ज्याप्रमाणे अनिल कपूर आपल्या पत्नीला प्रेमाचा ‘आर्जव’ करतो ते सगळे डबल मिनिंग आहे.4. सनी देओल आणि अर्चना पुरण सिंग किसिंग सीन (आग का गोला) :तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सनी देओलनेदेखील असे सीन केले आहेत. निहलानी यामुळे भारताची पीढी कशी खराब होणार नाही याचे उत्तर काय देणार?5. पारदर्शी साडी (इल्जाम)चित्रपटात अनिता राज या अभिनेत्रीने प्यार हो गया गाण्यात पाण्यामध्ये ट्रान्सपरंट साडी घालून जे काही नृत्य केले आहे त्याला तर निहलानींच्या बोर्डाने सेन्सॉर करायलाच हवे.6. जाने दे जाने दे (शोला और शबनम)गोविंदा-दिव्या भारती स्टारर ‘शोला और शबनम’ चित्रपटातील ‘जाने दे जाने दे’ गाण्यातील अक्षरश: सर्व डान्स स्टेप सेन्सॉर करायला हव्या होत्या.7. बन के मोहब्बत तुम (दिल तेरा दिवाना) :या गाण्यातील पावसाळी रोमान्स म्हणजे आर्टिस्टिक एक्सप्रेशन अर्थातच कलात्मक अभिव्यक्तीची सीमा ओलांडून जाणारी आहे.8. कु कु कु (अंदाज) :आतापर्यंत तुम्हालाही कळाले असेल की, ‘अंदाज’ चित्रपटातील सर्वच गाणी जरा अश्लिलतेकडे झुकलेली आहे. या गाण्यात तर हीरो-हीरोईन त्यांची प्लॅनिंग ‘रोज करेंगे, हम करेंगे, कु कु कु’ म्हणून साफ स्पष्ट करतात.9. अंगणा में बाबा (आंखे) : नायिक (शिल्पा शिरोडकर) नायकाला (गोविंदा) घरी येण्याचे आमंत्रण देतााना म्हणते की, ‘खेत गए बाबा, बाझार गई मा, अकेली हूं घर मा, तु आजा बलमा’. आता याला काय म्हणायचे?10. तुने कहा जब से हां (तलाश) :अक्षय कुमार आणि करिना कपूर या गाण्यामध्ये कोणत्या प्रकारचा रोमान्स करत आहे हे निहलानीच जाणोत. आणखी अश्लीलता...