Join us  

SEE PIC : रणबीर कपूरचे रिल लाइफ मुले तुम्ही बघितलीत काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2017 8:45 AM

अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित तयार केल्या जात असलेल्या बायोपिकवर रणबीर कपूर किती मेहनत घेत आहे, हे गेल्या ...

अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित तयार केल्या जात असलेल्या बायोपिकवर रणबीर कपूर किती मेहनत घेत आहे, हे गेल्या काही दिवसांपासून समोर येत असलेल्या फोटोंवरून स्पष्ट होतेच. नुकतेच रणबीरचे संजूबाबाच्या लुकमधील काही फोटोज् व्हायरल झाले होते; त्यामध्ये रणबीर हुबेहूब संजूबाबासारखा दिसत होता. आता रणबीरचे त्याच्या आॅनस्क्रीन मुलांसोबतचे फोटोज् समोर आले आहेत. फोटोंमध्ये रणबीरचे मुलं खूपच क्युट दिसत आहेत. चित्रपटात रणबीर दोन मुलांचा बाप तसेच पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तो या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेत आहे. दरम्यान, मुलांसोबतच्या फोटोंमध्ये रणबीरची मुलांसोबतची केमिस्ट्री स्पष्टपणे दिसत आहे. हे दोन्ही मुले संजय दत्तचे जुळे मुले इकरा आणि शाहरानची भूमिका साकारणार आहेत. सूत्रानुसार रणबीर या चित्रपटात संजूबाबाच्या सहा वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्तच्या जीवनातील बदलत्या काळानुरूपच्या लुकमध्ये रणबीर दिसणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे नाव फिक्स केलेले नाही. मात्र चित्रपटाचे वर्किंग टायटल ‘दत्त’ असे ठेवण्यात आले आहे. चित्रपटात संजूबाबाचे पिता सुनील दत्तसोबतचे संबंध, तसेच आई नर्गिसच्या निधनानंतर त्याला करावा लागलेला संघर्ष दाखविण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याच्या पर्सनल आयुष्यातील बारीक-सारिक गोष्टींवरदेखील प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. दरम्यान ‘दत्त’ या बायोपिकमध्ये सुनील दत्तची भूमिका परेश रावल साकारणार आहेत, तर मनीषा कोइराला नर्गिस दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. मनीषाला ही भूमिका याकरिता आॅफर करण्यात आली की, ती कॅन्सरसारख्या आजाराने पीडित होती, तर नर्गिस दत्त यांनीदेखील कॅन्सरशी अखेरपर्यंत लढा दिला होता. त्यामुळे मनीषा ही भूमिका चांगल्या प्रकारे साकारू शकेल, असा निकष निर्मात्यांनी लावला. अर्थातच मनीषाने या भूमिकेला आतापर्यंत न्याय दिला असल्याचे समजते. याव्यतिरिक्त चित्रपटात अनुष्का शर्मा, दिया मिर्जा, सोनम कपूर, जिम सार्भ आणि विकी कौशल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.