Join us

SEE PICS : अखेर ठुमके लावून आमिर खानने केले ‘दंगल’चे सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2017 3:38 PM

मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘दंगल’चे यश दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र अद्यापपर्यंत ‘दंगल’च्या टीमने त्याचे सेलिब्रेशन ...

मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘दंगल’चे यश दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र अद्यापपर्यंत ‘दंगल’च्या टीमने त्याचे सेलिब्रेशन केले नाही. पहिल्यांदाच आमिर खान याने संपूर्ण टीमसह एका टीव्ही शोमध्ये ‘दंगल’ सेलिब्रेशन करताना धमाल केली. वास्तविक आमिर त्याच्या चित्रपटाचे कधीच कोणत्याही टीव्ही शोमध्ये प्रमोशन करीत नाही. पहिल्यांदाच असे घडले की, तो एका शोमध्ये आपल्या चित्रपटाचे सेलिब्रेशन करताना दिसला. सध्या आमिरच्या ‘दंगल’ने चीनमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. केवळ १३ दिवसांत चित्रपटाने ७.६ कोटी डॉलरपेक्षा अधिक कमाई केली आहे. ‘दंगल’ने चीनमध्ये सुरू असलेल्या कित्येक हॉलिवूडपटांना धोबीपछाड दिली आहे. अशात ‘सेलिब्रेशन तो बनता है ना!’ दरम्यान आमिरने सेलिब्रेशन केलेल्या शोमध्ये त्याची पत्नी किरण राव, दिग्दर्शक नितेश तिवारी, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, साक्षी आदी उपस्थित होते. या सगळ्यांनी एकच ठुमका लावत दंगलचे यश सेलिब्रेट केले. असो सध्या चीनमध्ये आमिरचा डंका असून, त्याने पॉप्युलॅरिटीच्याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मागे टाकले आहे. चीनमधील मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइटवरील आमिर खानच्या अकाउंटवर फॉलोअर्सची संख्या ५१८६ लाखांपेक्षा अधिक आहे. ही वेबसाइट चीनची सर्वाधिक लोकप्रिय वेबसाइट्सपैकी एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये चीनचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांचे भाषण चीनच्या जनतेला ऐवढे भावले होते की, वेइबो अकाउंटवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ११६९ लाख एवढी झाली होती. अजूनही त्यांच्या फॉलोअर्समध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत मोदी चीनमधील सर्वाधिक प्रभावी राजकीय व्यक्ती ठरले आहेत. मात्र आमिरच्या लोकप्रियतेने त्यांना ओव्हरटेक केले आहे.