दीपिका पादुकोण- रणवीर सिंग यांचा लग्नसोहळा पार पडला. हा सोहळा अतिशय खासगी असल्याने यावेळी केवळ रणवीर व दीपिकाचे अतिशय जवळचे नातेवाईक तेवढेच हजर होते. त्यामुळे लग्नसोहळ्यात सामील न होऊ शकलेल्या आप्तांसाठी दीपवीर ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहेत. येत्या २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे आणि यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईत दीपवीरच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. तूर्तास यापैकी पहिल्या रिसेप्शनची जोरदार तयारी सुरु आहे. दीपिका व रणवीर आज सकाळी या रिसेप्शनसाठी बेंगळुरुला रवाना झालेत.
बेंगळुरूला रवाना होण्यापूर्वीचे मुंबई विमानतळावरचे दोघांचेही फोटो तूर्तास वेगाने व्हायरल होत आहेत. विमानतळावर रणवीर व दीपिका दोघेही पांढऱ्या रंगाचे आऊटफिटमध्ये दिसलेत.
दीपिकाच्या गळयातील मंगळसूत्राने तसेच हातातील लाल चुड्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी दोघेही एकमेकांसोबत अतिशय आनंदी दिसले. दोघेही हसत हसत मीडियाच्या कॅमेºयांना सामोरे गेलेत.हे फोटो तुम्हीही पाहा आणि कसे वाटले ते आम्हाला जरूर कळवा.
गत १४ व १५ नोव्हेंबरला इटलीत रणवीर-दीपिका विवाहबद्ध झालेत. दोघांनीही कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला.