SEE PICS : करिना कपूरच्या लाडक्या तैमूरने एन्जॉय केला मुंबईचा पाऊस!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2017 5:14 PM
दोन दिवसांपूर्वीच करिना कपूर-खान मैत्रिण अमृता अरोरासोबत पाऊस एन्जॉय करताना दिसली होती. आता मम्मीप्रमाणेच तिच्या लाडक्या तैमूरलाही पाऊस प्रचंड ...
दोन दिवसांपूर्वीच करिना कपूर-खान मैत्रिण अमृता अरोरासोबत पाऊस एन्जॉय करताना दिसली होती. आता मम्मीप्रमाणेच तिच्या लाडक्या तैमूरलाही पाऊस प्रचंड आवडत असून, सध्या तो मुंबईचा पाऊस एन्जॉय करीत आहे. हे आम्ही नाही तर तैमूरच्या फोटोंवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. एकीकडे मम्मी करिना पावसात जीमला जात असताना भिजण्याचा आनंद लुटत आहे, तर दुसरीकडे तैमूर घराच्याच बालकनीतील पाळण्यात बसून खिडकीतून पाऊस एन्जॉय करीत आहे. वास्तविक लहानग्या पाऊस नेहमीच आवडत असतो. पावसात भिजणे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. खरं तर तैमूरचा हा पहिलाच पाऊस असून, तो त्याचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. मात्र या फोटोमध्ये मम्मी करिना आणि पप्पा सैफ दिसत नाही. कारण परफेक्ट मोमेंट असलेल्या या फोटोंमध्ये हे दोघे असते, तर एक वेगळेच चित्र बघावयास मिळाले असते. पण काहीही असो, तैमूरचे हे फोटो बघून तो वडिलांप्रमाणेच रोमॅण्टिक होईल यात शंका नाही. खरं तर तैमूर दिवसागणिक क्यूट दिसत आहे. प्रत्येकवेळी त्याचा कुठला ना कुठला फोटो व्हायरल होत असतो. निळे डोळे आणि भुरे केस असा काहीसा लुक असलेला तैमूर कोणालाही लळा लावतो. काही दिवसांपूर्वीच तैमूर तुषार कपूरच्या मुलाच्या बर्थ डे पार्टीत सहभागी झाला होता. यावेळी लक्ष्य आणि तैमूरमध्ये चांगली गट्टीही जमली होती. दोघांनाही एकमेकांची कंपनी चांगली वाटत होती. दोघे एकत्र खेळत होते. वास्तविक तैमूरला भटकंती करायला खूप आवडते. जेव्हा मम्मी करिना घरी नसते, तेव्हा तो आजीच्या घरी टाइम स्पेंड करायला जात असतो. काही दिवसांपूर्वीच एक बातमी आली होती की, तैमूर मम्मीसोबत विदेशात जाणार आहे. ही त्याची पहिलीच विदेशी ट्रिप असेल. काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूरच्या मुलीचाही पाळण्यातील असाच काहीसा व्हिडीओ समोर आला होता. आता तैमूरचेही फोटोज् समोर आल्याने बच्चे कंपनी बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.