Join us

SEE POSTER: इरफान खान स्टारर ‘हिंदी मीडियम’चे टीझर पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 12:03 PM

इरफान खानने त्याचा आगामी चित्रपट ‘हिंदी मीडियम’चे नवे टीझर पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. यापूर्वी रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरप्रमाणे ...

इरफान खानने त्याचा आगामी चित्रपट ‘हिंदी मीडियम’चे नवे टीझर पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. यापूर्वी रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरप्रमाणे यामध्ये इरफान आणि त्याची मुख्य नायिका पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर दिसत नाही. दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका मध्यम वर्गीय कुटुंबाची कथा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.पोस्टरमध्ये एका व्यक्तीच्या एका पायात फाटकी जीन्स आणि जीर्ण बूट असून त्यामधून त्याच्या पायाला झालेल्या जखमा दिसतात तर दुसऱ्या पायात अत्यंत पॉश महागडा बूट आणि इस्त्री केलेली फॉर्मल पँट घातलेली दिसते. दोन वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील विसंगती या पोस्टरमधून दिसते.याबरोबरच पोस्टरवर एका वाक्य लिहिले आहे की, ‘लबाडी, खोटे बोलणे. पालक जे आपल्या मुलांना चांगल्या शाळेत टाकण्यासाठी वाट्टेल ते करतील.’ यावरून तरी हा चित्रपट आपल्या देशाच्या शिक्षण अव्यवस्थेवर असेल असे दिसतेय. नेहमीच विचार करायला भाग पाडणारे सिनेमे करण्यासाठी प्रसिद्ध इरफानचा हा चित्रपटदेखील एक आगळवेगळा सामाजिक विषय घेऊन येत असल्याचे संके त या पोस्टरवरून मिळताहेत. या चित्रपटातून पाकिस्तानी अ‍ॅक्ट्रेस सबा कमर बॉलीवूडमध्ये पदार्पण क रतेय. ‘मांतो’ अणि ‘लाहोर से आगे’ अशा पाकिस्तानी चित्रपटांतून तिने काम केलेले आहे. तसेच फवद खानसोबत हिट पाकिस्तानी सिरीयल ‘दास्तान’मध्येसुद्धा ती झळकलेली आहे. दिल्ली येथील चांदणी चौक येथे राहणऱ्या एका मध्यम वर्गीय कुटूंबाला दिल्लीच्या हाय सोसायटीमध्ये अ‍ॅडजस्ट होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीवर आधारित चित्रपटाचे कथानक आहे.हिंदी मीडियम: इरफान खान आणि सबा कमर‘शादी के साईड इफेक्ट’ फेम दिग्दर्शक साकेत चौधरीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘हिंदी मीडियम’ची शूटींग पूर्ण झाली असून येत्या १२ मे रोजी तो प्रदर्शित होत आहे. इरफान खान सध्या अनुप सिंग दिग्दर्शित ‘द साँग आॅफ स्कॉर्पियन’ नावाच्या चित्रपटात व्यस्त असून यामध्ये तो उंट विक्रेत्याची भूमिका साकरत आहे. त्याच्यासोबत प्रसिद्ध इराणी अभिनेत्री गोलशिफ्ते फरहानी मुख्य नायिका म्हणून दिसणार आहे.ALSO READ: इरफान खान सबा कमरचा 'हिंदी मीडियम' रोमांटिक अंदाज