Join us

Deepika Ranveer Wedding: पाहा, वेडिंग पार्टीतील रणवीर सिंगच्या ‘अतरंगी’ ड्रेसचा मेकिंग व्हिडिओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 1:51 PM

रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्या लग्नाला जवळपास १२ दिवस होत असले. पण अद्यापही या ग्रॅण्ड वेडिंगच्या चर्चा थांबलेल्या नाहीत.

ठळक मुद्देसेलिब्रिटी फॅशन डिझाईनर मनीष अरोराने रणवीरचा हा ड्रेस डिझाईन केला होता. आता मनीषने या ड्रेसचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रणवीर सिंगदीपिका पादुकोण यांच्या लग्नाला जवळपास १२ दिवस होत असले. पण अद्यापही या ग्रॅण्ड वेडिंगच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. होय, लग्नानंतर रणवीरची बहीण रितिका भवनानी हिने आपल्या भाऊ आणि वहिणीसाठी खास पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही पाहिलेच. या पार्टीतील रणवीरच्या अतरंगी लूकची बरीच चर्चा रंगली होती.पार्टीतील रणवीरचा हा लूक त्याच्या ‘पद्मावत’ या चित्रपटातील ‘खिल्जी’ची आठवण करून देणारा होता. सेलिब्रिटी फॅशन डिझाईनर मनीष अरोराने रणवीरचा हा ड्रेस डिझाईन केला होता. आता मनीषने या ड्रेसचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मेकिंग व्हिडिओ पाहिल्यानंतर जाणवते की, या ड्रेससाठी मनीष व त्याच्या टीमने बरेच कष्ट घेतलेत. या ड्रेसवर गुलाबी व निळ्या रंगाचे थ्रेड वर्क आणि बीट वर्क करण्यात आले आहे. या ड्रेसचे सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे, ड्रेसवरची पुसी कॅट. या कोटवर हार्ट शेप इम्बेलिशमेंट होते. या कोटसोबत रणवीरने ब्लॅक ट्राऊजर कॅरी केला होता. त्याचे हे संपूर्ण लूक ‘पद्मावत’मधील त्याच्या खिल्जी लूकची आठवण करून देणारे ठरले.रणवीर व दीपिकासाठी आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीत केवळ कुटुंबीय आणि अतिशय जवळचे मित्र तेवढे होते. रणवीरची बहीण रितिकाने जातीने सजावटीपासून पार्टीतील मेन्यूची व्यवस्था पाहिली होती. या पार्टीनंतर येत्या २८ नोव्हेंबरला दीपवीरचे मुंबईतचं ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनमध्ये केवळ बॉलिवूडचे मंडळी दिसतील. गत १४-१५ नोव्हेंबरला दीपिका व रणवीरने इटलीतील सुप्रिसिद्ध लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली होती. सिंधी आणि कोंकणी अशा दोन्ही पद्धतीने त्यांनी लग्न केले.

टॅग्स :दीप- वीरदीपिका पादुकोणरणवीर सिंग