Join us

​पाहा : लंडनच्या गर्दीत शाहरूख अनोळखी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2016 10:38 AM

होय, आम्ही सांगतोय आणि तुम्ही वाचतायं, ते अगदी योग्य आहे. लंडनमध्ये शाहरुखला कुणीही ओळखले नाही. इतकेच नाही तर शाहरूख ...

होय, आम्ही सांगतोय आणि तुम्ही वाचतायं, ते अगदी योग्य आहे. लंडनमध्ये शाहरुखला कुणीही ओळखले नाही. इतकेच नाही तर शाहरूख स्वत:ची बॅग स्वत: उचलताना दिसला. लंडनच्या चारिंग क्रॉस स्टेशनवरची ही शाहरूखची छायाचित्रे म्हणजे कुठल्याशा शूटींगची छायाचित्रे नव्हेत तर रिअल आहेत. लंडनमध्ये मुलगा आर्यन खान याच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीवरून परतत असताना गौरी व शाहरूख रविवारी संध्याकाळी चारिंग क्रॉस स्टेशनवर दिसले. यादरम्यान शाहरूख हातात बॅग घेऊन दिसला. इंस्टाग्राम युजर्स ‘४ें१२’५१ याचे हे फोटो क्लिक करून सोशल मीडियावर शेअर केले.   शाहरूखचे हे फोटो पाहून एका यूजरने कुमारला काही प्रश्नही विचारले. लंडनमध्ये शाहरूखला कुणी ओळखले नाही का? असा एक प्रश्न  त्याला विचारण्यात आला. यावर कुमारने दिलेले उत्तर आश्चर्यकारक  होते. शाहरूखला पाहून आता त्याला त्याचे चाहते आणि पापाराझींचा वेढा पडेल, असे मला एका क्षणाला वाटले होते. मात्र असे झाले नाही. माझ्याशिवाय कुणाचेही त्याच्याकडे लक्ष गेले नाही. केवळ मीच त्याचे काही फोटो घेतले. शाहरूख व गौरी घाईघाईने निघाले होते, कदाचित त्यामुळे त्यांना कुणी ओळखले नसावे, असे कुमारने सांगितले. मार्च महिन्यात महानायक अमिताभ बच्चन यांच्याबाबतही दिल्लीत असेच घडले होते. दिल्लीच्या रस्त्यावर एका चित्रपटाच्या शूटींगदरम्यान त्यांना दिल्लीकर ओळखू शकले नव्हते.