बॉलीवुडमध्ये थोडं यश मिळालं की कलाकार हुरळून जातात. आपण काही तरी खूप मोठं केलं आहे, स्टार झालो आहोत अशी भावना त्यांच्यात वाढू लागते. अवघ्या काही दिवसांत स्टारडम आल्यानं आपल्यापुढे इतर व्यक्ती कुणीच नाही असं त्यांना वाटू लागते. मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत आजही असे काही मोजके कलाकार आहेत जे बरंच यश मिळूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. यात आवर्जुन उल्लेख करावा लागेल तो अभिनेता राजपाल यादवचा.
आग्रा इथल्या एका बँकेत कॅशिअरची नोकरी करणा-या मुलासह राजपालची लेक ज्योती रेशीमगाठीत अडकली होती. ज्योती ही राजपालची पहिली पत्नी करुणा हिची लेक आहे. ज्योतीच्या जन्मावेळीच तिच्या आईचा मृत्यू झाला. तेव्हापासून जवळपास 15 वर्षे ज्योती कुंडरा या गावातच राहत होती. गेल्या 5 वर्षांपासून ती वडिल राजपालसह मुंबईत राहत होती. उत्तर प्रदेशमधील शाहजांहपूर इथल्या कुंडरा या वडिलोपार्जित गावात राजपालची लेक ज्योतीचा विवाहसोहळा संपन्न झाला होता. या सोहळ्याला कुणीही बॉलीवुडचे सेलिब्रिटी उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे कोणताही बडेजावपणा नव्हात. राजपालआजही आपल्या माणसांसह मिळून मिसळून राहतो.
राजपालने 10 जून 2003 रोजी दुसरे लग्न केलं होते. राधा ही राजपालची दुसरी पत्नी आहे. हिरो सिनेमाच्या शुटिंगसाठी राजपाल कॅनडाला गेला होता. त्यावेळी एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून राजपाल आणि राधाची भेट झाली. पहिल्याच भेटीत दोघांचं ट्युनिंग चांगलं जमलं. दोघांच्या उंचीत दोन इंचाचा फरक आहे. असं असूनही त्यांच्यात घट्ट बॉन्डिंग तयार झालं. राजपाल आणि राधा यांच्या आयुष्यात हनी नावाची एक छोटी लेक आहे.