Join us

​ ‘घूमर’ गाण्यात दीपिका पादुकोणची झाकलेली कंबर पाहून नेटक-यांना आले हसू !!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 6:46 AM

‘पद्मावत’ हा वादग्रस्त चित्रपट अखेर येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. पण तत्पूर्वी या चित्रपटातील ‘घूमर’ हे गाणे नव्याने चर्चेत आले होते. होय, या चित्रपटातील ‘घूमर’ हे गाणे लोकांमध्ये कमालीचे लोकप्रीय झाले. पण दुसरीकडे करणी सेनेला मात्र हे गाणे तितकेच खटकले होते.

‘पद्मावत’ हा वादग्रस्त चित्रपट अखेर येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. पण तत्पूर्वी या चित्रपटातील ‘घूमर’ हे गाणे नव्याने चर्चेत आले होते. होय, या चित्रपटातील ‘घूमर’ हे गाणे लोकांमध्ये कमालीचे लोकप्रीय झाले. पण दुसरीकडे करणी सेनेला मात्र हे गाणे तितकेच खटकले होते. या गाण्यावरून बराच वाद झाला होता.  हे गाणे राजपूत सभ्यतांना धरून नाही, असा करणी सेनेचा आक्षेप होता. यावर तोडगा म्हणून या गाण्यात अनेक बदल सुचवले गेलेत. सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानुसार, संजय लीला भन्साळींनीही हे बदल मान्य केलेत. या बदलानंतर  ‘घूमर’ हे गाणे नव्याने रिलीज करण्यात आले आहे.आधी या गाण्याची लांबी ५ मिनिटे ६ सेकंद होती. पण नव्याने रिलीज करण्यात आलेल्या या गाण्याची लांबी ३ मिनिट १६ सेकंद आहे. म्हणजे, गाण्यात २ मिनिटांचे फुटेजवर कात्री चालवण्यात आली आहे.  ‘घूमर’चे नवे व्हर्जन ‘पद्मावत’ नावाने जारी करण्यात आले आहे. जुन्या व्हर्जनमध्ये दीपिकाच्या कमरेवर फोकस करण्यात आला होता. यात तिची ३ इंच उघडी कंबर दिसत होती. मात्र करणी सेनेने यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे नव्या व्हर्जनमध्ये दीपिकाच्या कमरेचा उघडा भाग व्हीएफएक्स तंत्राद्वारे झाकण्यात आला आहे. या गाण्यात दीपिकाचे काही क्लोज शॉट्स होते.त्यामुळे व्हीएफएक्स तंत्राचा वापर करणे कठीण होत होते. त्यामुळे हे क्लोज शॉट्सही गाण्यातून गाळण्यात आले आहेत. त्यामुळे गाण्याची लांबी २ मिनिटांनी कमी झाले आहे. पण कदाचित हे सगळे बदल लोकांना रूचलेले दिसत नाहीये. twitterवर लोकांनी  नव्या गाण्यातील या बदलांची जोरदार खिल्ली उडवली आहे. ‘सौदी अरबमध्ये तुमचे स्वागत आहे. घूमरच्या नव्या व्हर्जनमध्ये दीपिकाच्या कमरेचा भाग झाकण्यात आला आहे,’असे अमित रमानी नामक एका युजरने लिहिले आहे.ALSO READ :​‘पद्मावत’चा वाद तापणार! करणी सेनेची प्रसून जोशींना राजस्थानात पाय ठेवू न देण्याची धमकी!!शूटींगच्या पहिल्या दिवसापासून भन्साळींचा ‘पद्मावत’ वादात सापडला आहे. अनेक वादानंतर काही दुरूस्त्यांसह सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या रिलीजला परवानगी दिली. पण यानंतरही करणी सेनेने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी लावून धरलीय.  हा विरोध फक्त राजस्थान पुरता मर्यादित नाही आहे तर देशातल्या अन्य राज्यांमध्ये समान स्थिती आहे. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात सारख्या राज्यांमध्येही ‘पद्मावत’ला जोरदार विरोध होतो आहे.