बॉलिवूडची मुन्नी म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोरा ग्लॅमरस फोटोशूटमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. दरम्यान काही दिवसांपूर्वी तिला कोरोनाची लागण झाली होती आणि आता ती त्यातून पूर्णपणे बरीदेखील झाली आहे. आता ती पूर्ण बरी झाल्यानंतर इंडिया बेस्ट डान्सरच्या मंचावर दाखल देखील झाली आहे.
मलायका अरोरा वयाची चाळीशी ओलांडलेली असतानाही आजही ती फिट आहे. बऱ्याचदा ती स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत येत असते. तसेच काही वेळेला तिला ट्रोलिंगचादेखील सामना करावा लागतो. नुकतीच ती इंडियाज बेस्ट डान्सर या शोच्या मंचावर पोहचली. तिथे तिचे चाहते तिला पाहून खूप खूश झाले. तर ट्रोलर्सने तिच्यावर वाईट कमेंट्स करत ट्रोल केले.
मलायका अरोराला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ती तिच्या तब्येतीबाबत सोशल मीडियावरून अपडेट देत राहत होती. आता ती बरी झाली आहे तर लगेच बाहेर पडताना दिसली. ती तिच्या घराजवळील सलूनमध्ये गेली होती. तिथे असलेल्या फोटोग्राफर्सनी तिला लगेच कॅमेरात कैद केलं. पण यावरून लोक तिला ट्रोल करू लागले.
मलायकाने कोरोनातून बरी झाल्यावर तिचा अनुभव शेअर केला होता. मलायकाने कोरोनातून बरी झाल्याची बातमी इन्स्टाग्रामवर दिली होती. तिने लिहिले होते की, रूमच्या बाहेर निघणेही आउटींग करण्यासारखं आहे.