}}}} ">Cried my heart out in #LION ....and absolutely loved #DevPatel ....sad and cathartic....but so magical in many moments....— Karan Johar (@karanjohar) January 6, 2017
देव पटेलचा अभिनय पाहून करण जोहरच्या डोळ्यात आले अश्रू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2017 9:34 PM
बॉलिवूड निर्माता करण जोहर याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. अनेक रियालिटी टीव्ही शोमध्ये तो जजच्या रुपात स्पर्धकांचे परफॉर्मन्स ...
बॉलिवूड निर्माता करण जोहर याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. अनेक रियालिटी टीव्ही शोमध्ये तो जजच्या रुपात स्पर्धकांचे परफॉर्मन्स चेक करीत असतो. कॉफी विद करण या शोमधून तो अनेकांना बोलते करतो. अतिशय प्रोफेशनल व्यक्त ी म्हणून ओळख असलेला करण जोहर हा भावनिक आहे याची प्रचिती नुकतीच पहायला मिळाली. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा करण जोहर हॉलिवूडचा एक चित्रपट पाहून हळवा झाला. निकोल किडमॅनची प्रमुख भूमिका असलेला ‘लायन’ हा चित्रपट पाहून करण जोहरला आपले अश्रू आवरता आले नाहीत. ‘लायन’ चित्रपटात निकोल कि डमन सह रॉनी मारा आणि भारतीय वंशाचा ब्रिटीश अभिनेता देव पटेल, अभिनेत्री दीप्ती नवल, तनिष्ठा चटर्जी, प्रियंका बोस आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला करणने हजेरी लावली होती. या चित्रपटातील कलावंतांचा अभिनय पाहून त्याचे अश्रू अनावर झाले. लायन या चित्रपटात आई-वडिलांचा शोध घेणाºया मुलाची क था मांडण्यात आली आहे. ही भूमिका देव पटेलने साकारली असून त्याचा अभिनयाने प्रभावित झालेल्या करणच्या डोळ्यात अश्रू आले. ‘‘लायन’ पाहून माझे हृदय पाझरले...मला देव पटेल खूप आवडला...दु:खी आणि भेदक गोष्ट पाहिली...परंतु अनेक जादुई क्षणही मी अनुभवले’ अशी पोस्ट करण जोहरने ट्विटरहून केली आहे. बेअर्ली यांच्या ‘ए लाँग वे होम’ या पुस्तकावर आधारित ‘लायन’ चित्रपट आहे. हरवलेल्या भारतीय मुलाला एक परदेशी दांपत्य दत्तक घेते. २५ वषार्चा झाल्यानंतर हा मुलगा आपल्या आईच्या शोधार्थ भारतात येतो अशी ‘लायन’ चित्रपटाची कथा आहे. ‘लायन’ हा चित्रपट २४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे शूटींग कोलकाता आणि आॅस्ट्रेलियात पार पडले आहे.}}}} ">http://