जहीर खानचा फोटो बघून युजर्सनी म्हटले, ‘भाईला आले लग्नातील खर्चाचे टेन्शन’!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2017 12:26 PM
सागरिकाने पती जहीर खानचा एक फोटो शेअर केला असता युजर्सनी त्याची चांगलीच खिल्ली उडविली, पहा फोटो!
नुकतेच क्रिकेटपटू जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांचा विवाहसोहळा पार पडला. कोर्ट मॅरेजनंतर ग्रॅण्ड रिसेप्शन देणारे हे कपल सध्या हनिमूनवर आहे. मालदीव येथे हनिमूनसाठी गेलेल्या या कपलने त्यांचे काही फोटोज् इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून, त्यास लोकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. मात्र त्यातील एका फोटोला लोक जहीरला सल्ला देताना दिसत आहेत. होय, सागरिकाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये जहीर एकटाच खुर्चीवर बसलेला दिसत असून, मेन्यू कार्ड किंवा बिल न्याहाळत आहे. जहीरच्या या फोटोला आतापर्यंत ६७,१७० एवढे लाइक मिळाले असून, अनेकांनी त्यास कॉमेण्टही दिल्या आहेत. त्यातील काही कॉमेण्ट जहीरला सल्ला देणाºया आहेत. खरं जहीरचा हा फोटो लोकांकडून खूप पसंत केला जात आहे. त्याचबरोबर या फोटोची खिल्लीही उडविली जात आहे. खुर्शीद मंजर नावाच्या युजरने लिहिले की, ‘भाई... लग्न केल्यानंतर बिलाकडे बघत नसतात, कारण लग्नानंतर हे सर्व बघणे चांगले वाटत नाही.’ ईआर अबानीने लिहिले की, ‘लग्नात खूप खर्च झाला काय?’ दीपक नागेने लिहिले की, ‘कोºया पानावर तू काय वाचत आहेस?’, इट्स चिश्तीने लिहिले, ‘कोºया कागदावर अखेर तू काय वाचत आहेस?’, आयएम इरशादने लिहिले, ‘भाई खूश दिसत नाही’, संदीपने लिहिले, ‘हनिमूनवर असताना तू दु:खी का दिसत आहेस?’, तर रवि थान्वीने लिहिले की, ‘सरजी, लग्नातील खर्चाचा हिशोब लावत आहात काय?’ या अगोदरही सागरिकाने जहीरचा एक फोटो शेअर केला होता, ज्याला टेनिसपटू सानिया मिर्झा हिने खिल्ली उडविणारे कॉमेण्ट दिले होते. या फोटोमध्ये समुद्रकिनाºयावर एक आलिशान डेक बघावयास मिळत होते. या डेकवर आरामदायक नेटवर जहीर एकटाच दिसत होता. या फोटोला कॉमेण्ट देताना सानियाने लिहिले होते की, ‘असे वाटत आहे की, जहीर एकटाच हनिमून साजरा करीत आहे.’ सानियाच्या या कॉमेण्टनंतर लोकांनीही या फोटोवर मजेशीर कॉमेण्ट दिल्या.