बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आपल्या चितरंगी फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. काल-परवा रणवीर सिंग एका इव्हेंटमध्ये दिसला. या इव्हेंटमध्ये रणवीरने धमाकेदार एन्ट्री केली. त्याला पाहून सगळेच अवाक झालेत. लाल, निळा, पिवळ्या वाईब्रेंट कलरचा कोट-पँट घालून तो या इव्हेंटमध्ये पोहोचला. त्याचा हा अवतार पाहून अनेकांना दिवाळीच्या फटाख्यांची आठवण झाली.
याचे कारण म्हणजे, रणवीरच्या कोट-पँटवर फटाख्यांच्या पाकिटासारखी प्रिंट होती. या इव्हेंटमध्ये रणवीरसोबत रोहित शेट्टीही दिसला. रणवीर आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक. त्याचा कूल अंदाज ही त्याची ओळख आहे, बिनधास्त वागणे, कोण काय म्हणतंय या कशाचाही विचार न करणे हे त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतात. बॉलिवूडमध्ये काम करणं हे त्याचं स्पप्न होतं. आज तो ते जगतो आहे. रणवीरचे विचित्र लूक्स आणि विचित्र फोटो नेहमी चर्चेत असतात.
रणवीर सिंग लवकरच ‘सिम्बा’ या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तूर्तास या चित्रपटाचे शूटींग सुरू होतेय.रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात रणवीरच्या अपोझिट सारा अली खान दिसणार आहे.याशिवरय करण जोहरच्या ‘तख्त’ या चित्रपटातही रणवीरची वर्णी लागली आहे. या मल्टिस्टारर चित्रपटात करिना कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर, अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत.