Seema Sajdeh on Divorce With Sohail Khan: बॉलिवूड इंडस्ट्रीत नाती बनायला आणि ती तुटायला वेळ लागत नाही. अनेक सेलिब्रिटींचे संसार मोडलेले आपण बघितले आहेत. ‘खान’ कुटुंबात एकापाठोपाठ एक असे दोन घटस्फोट झालेत. होय, काही वर्षांआधी सलमान खान भाऊ अरबाज खान याचा घटस्फोट झाला होता. काही महिन्यांआधी सलमानचा लहान भाऊ सोहेल खान (Sohail Khan )आणि त्याची पत्नी सीमा सजदेह (Seema Sajdeh) यांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला. दोघांचे फॅमिली कोटार्बाहेरचे फोटो व्हायरल झाले तेव्हा कुठे लोकांना याबद्दल कळलं होतं. सोहेल व सीमाच्या 24 वर्षांचा संसारांचा असा ‘दी एण्ड’ का व्हावा? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. आता सीमाने पहिल्यांदा याबद्दलचा खुलासा केला आहे.
सीमा ही फॅशन डिझाईनर आहे. सोहेल खान व सीमा यांच्या लग्नाला 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1998 साली दोघांचं लग्न झालं होतं. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. चंकी पांडेच्या साखरपुड्यात दोघांची भेट झाली होती. पहिल्याच नजरेत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. धर्म वेगळे असल्यानं या प्रेमात अनेक अडचणी आल्यात. सीमाच्या कुटुंबाला सोहेल व सीमाचं नातं, त्यांचं लग्न मान्य नव्हतं. पण दोघांनीही घरच्यांना न जुमानता लग्न केलं होतं. अगदी अर्ध्या रात्री मौलवींना किडनॅप करून दोघांना निकाह झाला होता. नंतर दोघांनी आर्य मंदिरात लग्न केलं होतं. त्यांना निर्वाण आणि योहन अशी दोन मुलं आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 2017 पासून सोहेल व सीमा वेगवेगळे राहत आहेत. पण आता दोघांनी कायदेशीररित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.