Join us

अनिल कपूरने शेअर केला त्याचा जुना फोटो, या फोटोत त्याला ओळखणे देखील होतेय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 19:00 IST

अनिलने त्याच्या ट्विटरवर नुकताच एक फोटो पोस्ट केला असून त्या फोटोत तो खूपच छान दिसत आहे.

ठळक मुद्देया फोटोसोबत त्याने लिहिले आहे की, छोटे डोळे, हडकुळे हात, खूप सारे हातावर केस पण तरीही कोणत्याही गोष्टीची पर्वा नाही. खूप सारी मेहनत, आत्मविश्वास, भाग्य यामुळेच प्रगती साधता आली.

अनिल कपूर हा बॉलिवूडमधील चॉकलेट हिरो मानला जातो. अनिलने वयाची साठी पार केली असली तरी तो आजही एखाद्या तरुण मुलासारखाच दिसतो. आजच्या तरुण अभिनेत्यांना लाजवेल अशी त्याच्यात एनर्जी आहे. त्यामुळे अनिल कपूरचे नेहमीच कौतुक केले जाते. अनिलने त्याचा तरुणपणाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत अनिलला ओळखणे देखील कठीण जात आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

अनिलने त्याच्या ट्विटरवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोत तो खूपच छान दिसत असून या फोटोसोबत त्याने लिहिले आहे की, छोटे डोळे, हडकुळे हात, खूप सारे हातावर केस पण तरीही कोणत्याही गोष्टीची पर्वा नाही. खूप सारी मेहनत, आत्मविश्वास, भाग्य यामुळेच प्रगती साधता आली.

 

अनिल कपूर गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट देत आहे. आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची मुलगी सोनम आणि मुलगा हर्षवर्धन यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली आहे. सोनमला तर प्रेक्षकांचे चांगले प्रेम देखील मिळत आहे. अनिल कपूरच्या अभिनयाइतकी त्याच्या फिटनेसची नेहमीच चर्चा केली जाते. अनिल आजही तरुण नायकांपेक्षाही हँडसम दिसतो असे सगळ्यांचेच म्हणणे आहे. अनिलला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याचे फॅन्स त्याला सोशल मीडियावर फॉलो करत असतात.  

टॅग्स :अनिल कपूर