Join us

नवाजुद्दीन सिद्धिकीच्या ‘बाबूमोशाय बंदूकबाज’वर सेन्सॉरची कात्री; ४८ सीन्स काढले जाण्याची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2017 3:54 PM

​पहलाज निहलानी यांच्या सेन्सॉर बोर्डाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकी याच्या आगामी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटावर ‘फुल आॅन गोलीबारी’ केली आहे.

पहलाज निहलानी यांच्या सेन्सॉर बोर्डाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकी याच्या आगामी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटावर ‘फुल आॅन गोलीबारी’ केली आहे. कारण चित्रपटातील एक-दोन नव्हे तर तब्बल ४८ सीन्सला कात्री लावली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात चित्रपटातील सीन्स काढण्याचा हुकूम दिल्याने पुन्हा एकदा सेन्सॉर बोर्ड चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च करण्यात आले. ट्रेलरने असा काही धमाका केला होता की, नवाजची प्रतिमाच जणूकाही बदलून टाकली. कारण नवाजही रोमान्स करू शकतो, हे या ट्रेलरमधून दिसून आले. ट्रेलरमध्ये नवाजने खूपच इंटिमेट सीन्स दिल्याचे दिसते. शिवाय ट्रेलर एवढा हॉट असेल तर संपूर्ण चित्रपट किती हॉट असेल, असा विचारही प्रेक्षकांना करण्यास भाग पाडले. मात्र नवाजने दिलेले हे सीन्स आता प्रेक्षकांना चित्रपटात बघावयास मिळणार नाहीत. कारण पहलाज निहलानी यांच्या संस्कारी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील ४८ सीन्सवर कात्री लावत पुन्हा एकदा आपल्यातील हकेखोरपणा दाखवून दिला आहे. जेव्हा याविषयी सेन्सॉरचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी म्हटले की, आम्ही फक्त आमचे काम केले. हा चित्रपट २५ आॅगस्ट रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात दिव्या दत्ता आणि बिदिता बेग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कुशन नंदी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जबरदस्त इटिमेंट सीन्स आहेत. चित्रपटात नवाज एक कॉन्ट्रॅक्ट किलरच्या भूमिकेत असून, त्याचा अंदाज बघण्यासारखा आहे. कारण चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर ‘गॅँग्स आॅफ वासेपूर’ या चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. चित्रपटात नवाजने फैजल नावाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. ट्रेलर ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी प्रतिसाद दाखविला त्यावरून हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर धूम उडवून देईल असेच काहीसे चित्र होते. परंतु आता सेन्सॉरने वॉर केल्याने चित्रपटाला अनंत अडचणीतून मार्ग काढावा लागणार असेच काहीसे दिसत आहे. आता चित्रपटातील सीन्स हटविण्यात निर्माते कितपत होकार देतील, याविषयी शंकाच आहे.