Join us  

'बजरंगी भाईजान'चा येणार सीक्वल! दिग्दर्शक कबीर खानने दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 7:01 PM

Bajrangi Bhaijaan Movie : सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' चित्रपट २०१५ साली रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.

सलमान खान(Salman Khan)चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'बजरंगी भाईजान' ( Bajrangi Bhaijaan Movie) २०१५ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. या चित्रपटात सलमान खान सोबत हर्षाली मल्होत्रा, करीना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याचं अनेकदा ऐकायलं मिळतं. त्यामुळे या चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान आता या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खानने चित्रपटाच्या सीक्वलवर भाष्य केले आहे.

कबीर खान म्हणाला की, प्रत्येक ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सीक्वलची काही गरज नसते. चित्रपटाचा सीक्वल तेव्हा बनवायला हवा, जेव्हा कोणती चांगली कथा मिळेल आणि त्याला पुढे मांडता येईल. कबीर खान 'बजरंगी भाईजान'च्या सीक्वलबाबत म्हणाला की, अजिबात नाही. मी असे म्हणणारा पहिला व्यक्ती असेन की प्रत्येक ब्लॉकबस्टर चित्रपटाला सीक्वलची गरज नसते. याच कारणामुळे मी माझ्या फिल्मी करिअरमध्ये सीक्वल बनवला नाही.

म्हणून त्याचा सीक्वल बनवू नये...

चित्रपट निर्माते कबीर खान यांनी सांगितले की, त्यांच्या लोकप्रिय चित्रपटांचे सीक्वल बनवण्यासाठी त्यांना अनेकदा विचारण्यात आले आहे. तो म्हणाला, "जेव्हाही माझ्याकडे यशस्वी चित्रपट झाला, तेव्हा लोकांनी मला या चित्रपटाचा सीक्वल बनवण्यास सांगितले. न्यूयॉर्क, टायगर आणि बजरंगी भाईजान या चित्रपटांनंतर मला हे विचारण्यात आले. पण, मी असे कधीच केले नाही. त्यामुळे मी केवळ चित्रपट यशस्वी झाला म्हणून त्याचा सीक्वल बनवू नये, असे म्हणणारा मी पहिला माणूस आहे."

असं मी कधीही म्हटलेलं नाही

कबीर खान पुढे म्हणाला की, जेव्हा तुम्हाला ती कथा पुढे नेण्यास योग्य अशी कथा सापडेल तेव्हाच सीक्वल बनवावेत. मी बजरंगी भाईजानच्या सीक्वलवर काम करत असल्याचे मी कधीही म्हटलेले नाही. मी आत्ताच म्हणालो की हो, कदाचित कधी कधी एखादी चांगली स्क्रिप्ट येते जी 'बजरंगी भाईजान'चा सीक्वल बनण्यास पात्र असते. मग मला ते करायला आवडेल. पण, ती इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे म्हणून नाही. यशस्वी चित्रपटांपैकी एक, म्हणून त्याचा सीक्वल आवश्यक आहे.

टॅग्स :सलमान खानकबीर खान