जायरा वसीमच्या व्हिडिओची गंभीर दखल; पोलिसांनी दाखल केला गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 10:09 AM
बॉलिवूड अभिनेत्री जायरा वसीम हिच्यासोबत विमानात छेडछाड झाल्याचे प्रकरण गंभीरपणे घेत, पोलिसांनी याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तिविरोधात आयपीसीच्या कलम ३५४ ...
बॉलिवूड अभिनेत्री जायरा वसीम हिच्यासोबत विमानात छेडछाड झाल्याचे प्रकरण गंभीरपणे घेत, पोलिसांनी याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तिविरोधात आयपीसीच्या कलम ३५४ आणि पास्को कायद्याअंतर्गतम गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी मुंबईच्या हॉटेलात जात, तिचे बयान नोंदवून घेतले. जायराने छेडछाडीचा व्हिडिओ पोस्ट करताच महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. महिला आयोगाने यासंदर्भात संबंधित विमान कंपनीकडून अहवाल मागितला आहे. दरम्यान जम्मू काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही जायरासोबत झालेल्या या घटनेची तीव्र निंदा करत, याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे म्हटले आहे. ‘दंगल’ चित्रपटात आमिर खानच्या आॅनस्क्रीन मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जायरा वसीम हिने विमानात छेडछाड झाल्याचा आरोप करत, सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत जायरा रडत रडत आपली आपबीती सांगताना दिसतेय. दिल्ली ते मुंबई विमानात छेडछाड झाल्याचा आरोप जायराने केला आहे. ज्या व्यक्तिने जायरासोबत छेडछाड केली तो तिच्या मागच्या सीटवर बसलेला होता. जायरा या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवू इच्छित होती. मात्र प्रकाश कमी असल्याने तिला हे करता आले नाही. अर्थात तिने एक फोटो पोस्ट केला आहे. यात एका व्यक्तिचा पाय दिसतो आहे. जायराने व्हिडिओत सांगितल्यानुसार, ती विस्तारा एअरलाईन्समधून प्रवास करत होती. तक्रार करूनही विमानातील क्रू मेंबर्सनी तिची कुठलीही मदत केली नाही. ‘मागच्या सीटवर बसलेला एक वयस्कर व्यक्ति पायाने माझ्या मानेला आणि पाठीशा स्पर्श करत होता. अंधाराचा फायदा घेऊन त्याने हे चाळे चालवले होते. मी त्याला विरोध केला. पण त्याला ओरडून सर्वांना सांगेल, अशी धमकीही दिली. पण त्याच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. विमानात मी याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्नही केला. मात्र अंधारामुळे ते शक्य झाले नाही,’असे जायरा लाईव्ह व्हिडिओत सांगताना दिसतेय. ALSO READ : ‘दंगल गर्ल’ जायरा वसीमसोबत विमानात छेडछाड! रडत रडत सांगितली आपबीती!!मुंबईत पोहोचल्या पोहोचल्या तिने इन्स्टाग्रामवर या घटनेबद्दल सांगितले. यावेळी ती स्वत:चे अश्रू रोखू शकले नाही. विमानात इतके सगळे लोक असूनही कुणीही माझ्या मदतीला आले नाही. क्रू मेंबर्सनीही माझी मदत केली नाही. मुलींची तुम्ही अशी काळजी घेणार का? असा सवाल तिने केला.