शबाना आजमी (Shabana Azmi) हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेत्री आहेत. सध्या शूटिंगमध्ये होणाऱ्या वाढत्या खर्चावर त्यांनी बोट ठेवलं आहे. तसंच आजकालचे कलाकार अव्वाच्या सव्वा मानधन मागतात यावरही त्यांनी नाराजी दर्शवली. आपल्या काळातील शूटिंगचा अनुभव सांगत त्यांनी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या.
हिंदुस्तान टाईम्सशी बातचीत करताना शबाना आजमी म्हणाल्या, "1970 ते 1980च्या दशकात आम्ही बसमधूनच प्रवास करायचो आणि सिनेमाच्या टीमसोबतच हॉटेलमध्ये राहायचो. माझ्यासोबत फक्त तीन लोक असायचे. हेअरड्रेसर, मेकअप आर्टिस्ट आणि ड्रायव्हर. कमी बजेट असणाऱ्या मेकअपपर्सन आणि हेअरड्रेसर असायचे. मी माझेच कपडे सिनेमातही घातले आहेत. यूनिटचे फक्त मेकअप आणि हेअरड्रेसर असायचे. तसंच मी नेहमी यूनिटसोबतच हॉटेलमध्ये राहायचे."
त्या पुढे म्हणाल्या, "मला आठवतंय की स्मिता पाटील आणि मला मंडीच्या शूटसाठी वेगवेगळ्या कार दिल्या होत्या. आम्ही दोनच दिवसाच कार सोडून दिल्या आणि कलाकारांसोबत बसनेच प्रवास केला. कारण आम्हाला सगळ्यांसोबतच मजा यायची."
"त्याकाळी केवळ कलाकरांनीच नाही तर फिल्ममेकर्सनेही सिनेमासाठी काही तडजोडी केल्या. तसंच आर्थिक अडचणींमुळे सिनेमा बंद पडू नये म्हणून अनेकदा शत्रुघ्न सिन्हा आणि संजीव कुमार यांनी आपल्या खिशातून पैसे दिले आहेत" असंही त्या म्हणाल्या.