बॉलिवूड अभिनेत्री शबाना आजमी (Shabana Azmi) यांच्या नावाने ऑनलाईन फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अभिनेत्रीने ट्वीट करत सर्वांना सावध केले आहे. माझ्या नावावरुन आलेले मेसेज, लिंक्स किंवा कॉल्सला उत्तर देऊ नका असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच शबाना यांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यात सेलिब्रिटींच्या नावाने लूट केली जात आहे. सामान्य लोकच नाही तर अनेक सेलिब्रिटी देखील या फसवणुकीचे शिकार झाले आहेत. शबाना आजमी यांनी मंगळवारी ट्वीट करत लिहिले,'आमच्या निदर्शनास आले की माझे सहकारी आणि माहितीतील लोकांना माझ्या नावाने काही मेसेज येत आहेत. हा स्पष्टपणे फिशिंगचा प्रकार आहे. कृपया अशा मेसेज आणि कॉलवर क्लिक करुन उत्तर देऊ नका. आम्ही पोलिसात तक्रार केली आहे. 66987577041 आणि +998917811675 या नंबरवरुन मेसेज कॉल्स येत आहेत.'
शबाना आजमीही झाल्या आहेत फसवणुकीच्या शिकार
दोन वर्षांपूर्वी शबाना आजमी स्वत: ऑनलाईन फसवणुकीच्या शिकार झाल्या आहेत. त्यांनी ऑनलाईन दारु मागवण्यासाठी अॅडव्हान्स पेमेंट केले होते. बराच वेळ झाल्यानंतरही डिलीव्हरी आली नाही तेव्हा त्यांना फसवणुक झाल्याचं लक्षात आलं.
शबाना आजमी नुकत्याच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात झळकल्या. यातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडली. त्यांची आणि धर्मेंद्र यांची केमिस्ट्री खूप गाजली.