शाहरूख खान व अमिताभ बच्चन पुन्हा एकदा दिसणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 07:45 PM2018-12-06T19:45:56+5:302018-12-06T19:46:37+5:30

बॉलिवूडचे दोन सुपरस्टार अमिताभ बच्चन व शाहरूख खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत.

Shah Rukh Khan and Amitabh Bachchan once again appear together | शाहरूख खान व अमिताभ बच्चन पुन्हा एकदा दिसणार एकत्र

शाहरूख खान व अमिताभ बच्चन पुन्हा एकदा दिसणार एकत्र

googlenewsNext
ठळक मुद्देअमिताभ बच्चन व शाहरूख खान पुन्हा एकत्रसुजॉय घोषच्या सिनेमात झळकणार बिग बी व किंग खान

बॉलिवूडचे दोन सुपरस्टार अमिताभ बच्चन व शाहरूख खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. सुजॉय घोष दिग्दर्शित एका थ्रिलर सिनेमात हे दोघे काम करणार आहेत. या चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त अभिनेत्री तापसी पन्नू महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.


सुरूवातीला असे वृत्त येत होते की शाहरूख खान सुजॉय घोषच्या चित्रपटात केमिओ करताना दिसणार आहे. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूख या चित्रपटात गेस्ट अपियरन्स करणार नसून मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शाहरूख तापसी पन्नूच्या पतीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. 
हा सिनेमा मर्डर मिस्ट्रीवर आधारीत असून यात अमिताभ बच्चन पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून ते या चित्रपटात मर्डर केस सोडवताना दिसणार आहेत. तापसी पन्नू व्यावसायिक महिलेच्या भूमिकेत पाहायला मिळेल. हा चित्रपट स्पॅनिश सिनेमा कंट्राटैम्पोचे अधिकृत हिंदी व्हर्जन असणार आहे.
शाहरूख खान झिरो चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन व शाहरूख खान यांनी एकत्र बऱ्याच सिनेमात काम केले आहे. करण जोहरचा चित्रपट कभी खुशी कभी गममध्ये अमिताभ व शाहरूख बापलेकाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच २००८ साली प्रदर्शित झालेल्या भूतनाथमध्ये ते दोघे एकत्र झळकले होते. ते दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार म्हटल्यावर त्यांचे चाहते खूप खूश झाले आहेत. 

Web Title: Shah Rukh Khan and Amitabh Bachchan once again appear together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.