शाहरूख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यावरून गायब आहे. त्याचे फॅन्स त्याच्या कमबॅकची आतुरतेने वाट बघत आहेत. अनेकांना असं वाटत आहे की इतर स्टार्सप्रमाणे शाहरूख खानही ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री मारतील. मात्र, किंग खानने त्याच्या शानदार अंदाज एन्ट्री घेतली आहे. त्याने त्याच्या स्वत:च्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. शाहरूख खानने त्याच्या नवा ओटीटी प्रोजेक्ट SRK+ ची घोषणा केली आहे.
एआरके प्लस (SRK PLUS) ची घोषणा करत शाहरूखने फोटोसोबत लिहिलं की, ‘ कुछ कुछ होने वाला है, ओटीटी की दुनिया में…’ शाहरूख खानने जशी ही पोस्ट शेअर केली, ट्विटरवर त्याच्या फॅन्सचा उत्साह बघायला मिळत आहे.काही दिवसांपूर्वी एका कोल्ड ड्रिंकच्या जाहिरातीत आणि आगामी सिनेमा 'पठाण'च्या घोषणेनंतर ही तिसरी वेळ आहे की, शाहरूखने त्याच्या फॅन्सना एक सरप्राइज दिलं आहे. यावरून हे स्पष्ट दिसत आहे की, काही वर्षांपासून गायब असलेला शाहरूख खान आता चांगलाच अॅक्टिव झाला आहे. तसेच येणाऱ्या काळातही आपल्या फॅन्सना तो आणखी सरप्राइज देणार आहे.
गेल्यावर्षी शाहरूख खानने एक मजेदार व्हिडीओ शेअर करत हिंट दिली होती की, तो लवकरच ओटीटी स्पेसमध्ये काहीतरी करणार आहे. व्हिडीओत शाहरूख मन्नतच्या छतावर उभा राहून फॅन्सकडे हात दाखवत होता. शाहरूख आपल्या मॅनेजरला सांगतो की,'इतके फॅन्स कुणाच्या घराबाहेर आहेत का?'. यावर मॅनेजर म्हणतो, 'नाही सर, आतापर्यंत तरी नाही पाहिले. पण पुढे काही सांगता येत नाही'. यावर शाहरूख विचारतो 'म्हणजे'. मग मॅनेजर म्हणतो की, 'बाकी सर्व स्टार्सचे तर डिज्नी प्लस हॉटस्टारवर शो आणि सिनेमे येत आहेत. अजय, अक्षय, सैफ, संजू बाबा....' हे ऐकून शाहरूख त्याला विचारतो की 'सगळे आहेत का?'. मॅनेजर म्हणतो - सगळे तर नाही. शाहरूख म्हणतो - कोण नाही. तर मॅनेजर म्हणजो, 'सर तुम्ही...'.
आता शाहरूखने एसआरके प्लसची घोषणा केली आहे. म्हणजे हे नक्की की, शाहरूख डिज्नी प्लस हॉटस्टारवर काहीतरी धमाकेदार करणार आहे. आता ते नेमकं काय हे बघणं खरंच उत्सुकतेचं ठरणार आहे.