Join us  

शाहरुख खानने 'डंकी'च्या शूटिंगदरम्यान विकी कौशलची मागितली होती माफी, कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 3:39 PM

Dunki Movie : 'डंकी' चित्रपटातून विकी कौशल आणि शाहरुख खान पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत आणि विकी कौशल या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहे.

अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)चा नुकताच 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या चित्रपटानंतर विकी शाहरूख खान(Shah Rukh Khan)सोबत 'डंकी' (Dunki Movie) चित्रपटात झळकणार आहे. दरम्यान आता विकी कौशलने डंकी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानने त्याला फोन करुन माफी मागितल्याचे सांगितले. तो म्हणाला की, शाहरुखला खूप वाईट वाटत होते. काय घडले, याबद्दलही विकी कौशलने सांगितले. डंकी चित्रपटातून विकी आणि शाहरुख खान पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत आणि विकी कौशल या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहे. मात्र किंग खानने जेव्हा त्याची माफी मागितली, तेव्हा तो थक्क झाला होता. याबद्दल विकी कौशलने नुकतेच कॉफी विथ करण शोमध्ये सांगितले.

कॉफी विथ करण ८च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये विकी कौशल आणि कियारा आडवाणीने हजेरी लावली होती. विकी कौशलने या शोमध्ये दिल्लीत झालेल्या शूटबद्दल सांगितले नाही, मात्र किंग खानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. यावेळी विकी कौशलने शाहरुख खानचा सांगितलेला किस्सा ऐकून सगळेच हैरण झाले. विकीने सांगितले की, शूटिंगदरम्यान एक दिवस शाहरुख खानला एका महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला जावे लागले आणि ते काम दुसऱ्या कोणत्या दिवशी होऊ शकत नव्हते. हा चित्रपटातील विकीच्या भूमिकेसाठी महत्त्वाचा क्षण होता आणि त्याच्यासोबत होता. शाहरुख त्या शॉटसाठी तिथे उपस्थित राहू शकत नव्हता. त्यामुळे तो शॉट विकीला बॉडी डबलसोबत द्यावे लागले. रात्री जेव्हा शाहरुख काम आटपून आला आणि त्याने विकी कौशलला रात्री उशीरा बोलवले, पण विकी जाऊ शकला नाही. कारण त्याला एका इव्हेंटला जायचे होते.

किंग खानने पाठवला भला मोठा मेसेज

विकी कौशलने पुढे म्हटले की, परत त्यांनी मला भला मोठा मेसेज पाठवला. विकी, तो सीन आपण परत शूट करुयात. मला माफ कर कारण मी तुला क्यूज देण्यासाठी तिथे उपस्थित राहू शकलो नाही. वास्तवात मला याचे खूप वाईट वाटत आहेत. मग मला शाहरुख सरांना फोन करावा लागला आणि सांगावे लागले की, सर्व काही नीट झाले आणि राजू सर शॉटवर खूश आहेत. मला या गोष्टीची भीती वाटत होती की, ते सीन मी परत शूट करु शकेन का.त्यांना वाईट वाटत होते. दुसऱ्या दिवशी सेटवर आल्यानंतर त्यांनी ते शूट पाहिले आणि खूश झाल्यानंतर निर्णय घेतला की, परत शूट करण्याची गरज नाही.

किंग खानसोबतचा अनुभव

विकी कौशल शाहरुख खानसोबतच्या कामासोबतचा अनुभव शेअर करताना म्हणाला की, शाहरुख सरांनी मला म्हटले की, डंकी माझा आतापर्यंतचा सर्वात चांगले काम आहे. त्यांना भेटणे, त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणे आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही होते.डंकी चित्रपटात शाहरूख खान आणि विकी कौशल व्यतिरिक्त तापसी पन्नू, बोमण ईराणी, धर्मेंद्र, सतीश शाह, परिक्षित साहनी आणि दीया मिर्झा आहे. हा चित्रपट २१ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

टॅग्स :डंकी' चित्रपटशाहरुख खानविकी कौशल